पथराई फाटय़ाजवळ भरधाव दुचाकीच्या धडकेत बालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:18 IST2019-07-11T11:18:07+5:302019-07-11T11:18:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाका ते नंदुरबार रस्त्यावर पथराई फाटय़ाजवळ भरधाव वेगातील मोटारसायकलने रस्ता ओलांडणा:या बालकास धडक दिली़ ...

Due to a bicycle in front of Patharai ghat | पथराई फाटय़ाजवळ भरधाव दुचाकीच्या धडकेत बालक ठार

पथराई फाटय़ाजवळ भरधाव दुचाकीच्या धडकेत बालक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाका ते नंदुरबार रस्त्यावर पथराई फाटय़ाजवळ भरधाव वेगातील मोटारसायकलने रस्ता ओलांडणा:या बालकास धडक दिली़ धडकेत बालक जागीच ठार झाला़ ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ 
गुंजन लालसिंग सोलंकी (7) असे मयत बालकाचे नाव असून मंगळवारी दुपारी रस्ता ओलांडत असताना त्याला जीजे 21 के 7385 या दुचाकीने धडक दिली होती़ यात गंभीर जखमी झाल्याने गुंजन याचा मृत्यू झाला़ मयत गुंजन याचे आई-वडील मध्यप्रदेशातून पथराई परिसरात मोलमजूरीसाठी आले होत़े क़ेडी़गावीत शैक्षणिक संकुल परिसरात ते रहात होत़े मंगळवारी आई-वडीलांना भेटण्यासाठी गुंजन हा जात असताना दुचाकीने त्याला धडक दिली़ घटनेनंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरुन पसार झाला़ याबाबत कपिल पावबा चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोटारसायकल चालकविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल सजन वाघ करत आहेत़ 
 

Web Title: Due to a bicycle in front of Patharai ghat