नंदुरबारातील कुपनलिकांना येतेय दरुगधीयुक्त पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 12:39 IST2019-02-16T12:39:18+5:302019-02-16T12:39:22+5:30
नंदुरबारातील प्रकार : भुमिगत गटारींचे पाणी ङिारपत असल्याची शक्यता

नंदुरबारातील कुपनलिकांना येतेय दरुगधीयुक्त पाणी
नंदुरबार : भुर्गातील पाणी पातळी खोल गेल्याने नंदुरबार शहरातील खाजगी कुपनलिकांचे पाणी दुषीत येवू लागले आहे. रेल्वे पट्टयापलिकडील विशेषत: कन्यादान मंगल कार्यालपासून थेट नळवा शिवार्पयत तसेच वाघोदा शिवारातील काही वसाहतींमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांनी कुपनलिका बंद करून ठेवल्या असून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
शहरातील अनेक भागात पाण्याची पातळी कमालीची खोल गेली आहे. अनेक नागरिकांनी केलेल्या कुपनलिका कोरडय़ा पडल्या आहेत. काही ठिकाणी जेमतेम पाणी असले तरी त्यातून दरुगधीयुक्त पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे कुपनलिकाधारक नागरिकांना आता विकतचे पाणी वापरावे लागत आहे.
नवीन वसाहतींच्या भागात नागरिक घर बांधकाम करतांनाच कुपनलिका करून घेतात. त्यामुळे पालिकेची नळजोडणी ते घेत नाहीत. शहरात आतार्पयतचा इतिहास पहाता तीव्र पाणी टंचाईची स्थिती कधी जाणवली नव्हती. त्यामुळे मे, जून महिन्यार्पयत खाजगी कुपनलिका सुरू राहत असे. यंदा मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने कुपनलिकांच्या पाण्याची पातळी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातच खोल गेली होती. अनेक नागरिकांना कुपनलिकेतील विद्युत मोटार आणखी खोल टाकावी लागली आहे. आता मात्र, पाण्याचा ठणठणाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कुपनलिका बंद करून ठेवल्या आहेत.
दरुगधीयुक्त पाणी
नळवा रस्त्यावरील तसेच मिशन विद्यालयाच्या मागील बाजूच्या वसाहतींमधील कुपनलिकांना सध्या दरुगधीयुक्त पाणी येऊ लागले आहे. आधीच पाण्याची पातळी खोल त्यात दरुगधीयुक्त पाणी येवू लागले आहे. हे पाणी पिण्यालायक नसल्याचे चित्र आहे. कुपनलिकांना दरुगधीयुक्त पाणी येण्याचे कारण काय? असा प्रश्न नागरिकांना सतावतो आहे. जर भुगर्भात पाणीच नाही तर पिवळ्या रंगाचे आणि दरुगधीयुक्त पाणी कसे बाहेर येत आहे याबाबतही चर्चा सुरू आहे.
पालिकेने तपासणी करावी
शहरातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्याचे काम पालिकेचे असते. परंतु अशा प्रकारची तपासणी अनेक वर्षापासून झालेली नसल्याचे सांगण्यात आले. विरचक आणि आंबेबारा धरणातून पाणी पुरवठा होत असल्यामुळे शहरातील इतर स्त्रोतांमधून होणारा पाणी पुरवठा हा पिण्यासाठी केला जात नाही. त्यामुळे अशा ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. खाजगी कुपनलिकाधारकांना स्वत:च पाण्याची तपासणी करून घ्यावी लागत असते.
उताराचा भाग
आणि ड्रेनेजचे पाणी
शहरातील सर्व भागाचा उतार हा नळवा रोडवरील भागात आहे. त्यामुळेच पालिकेने नळवा शिवारात पाताळगंगा नदीच्या काठावर सिल्व्हर ट्रीटमेंट प्लान्ट अर्थात ड्रेनेजचे पाणी शुद्धीकरण करण्याचा प्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी जाणारे ड्रेनेजचे पाणी या भागातील वसाहतींमध्ये ठिकठिकाणी थाबून आहे. त्याला कारण ड्रेनेजचे चेंबर फुटणे, नादुरूस्त होणे हे आहे. त्यामुळे ते पाणी जमिनीत जिरून ते कुपनलिकांमध्ये जात असल्याचेही या भागातील नागरिकांचे म्हणने आहे. याबाबत पालिकेने चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.