शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

विरोधकांच्या प्रभागातील कामांमध्ये दुजाभावचा पालिका सभेत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:55 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विरोधकांच्या प्रभागात काम करण्यास सत्ताधारी  दुजाभाव करीत असल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला. या आरोपांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विरोधकांच्या प्रभागात काम करण्यास सत्ताधारी  दुजाभाव करीत असल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला. या आरोपांचे नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी खंडन करीत सर्व भागात समान विकास करीत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, नगरपालिका कर्मचा:यांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला.  नंदुरबार नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या स्व. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आली. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून सभेला सुरुवात करण्यात आली. त्यापूर्वीही दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.व्यासपीठावर उपनगराध्यक्ष परवेज खान, मुख्याधिकारी बाबुराव बिक्कड, कार्यालयीन अधिक्षक  दिपक मुळे उपस्थित होते. शहरातील साक्री नाका ते तलावपाडा भिलाटी परिसरात रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण व गटारीचे बांधकाम निकृष्ट दजार्चे असून, सत्ताधारी नगरसेवक विरोधकांच्या प्रभागात विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करीत असल्याच्या आरोप भाजप नगरसेवकांनी केला. त्यास प्रत्युत्तर म्हणून नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावलेसभेच्या अजेंडय़ावर 18 विषय होते. अनेक विषयांवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार चर्चा झाली. दोन विषयांवर भाजपचे नगरसेवक प्रशांत चौधरी यांनी आक्षेप घेतला. साक्रीनाका ते तलाव पाडा भिलाटी पावेतो रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, रस्ता दुभाजक व गटार बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून, कामाचे देयक पडताळणी विना अदा करण्यात आले आहे. कोणाच्या परवानगीने देयके अदा करण्यात आली असा सवाल त्यांनी उपस्थित केला.सभेत झालेल्या आरोपांचे खंडन करताना नगराध्यक्षा र}ा रघुवंशी म्हणाल्या, विकास कामांमध्ये सत्ताधा:यांकडून कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण झालेला नाहीे. नंदनगरीतील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यास आम्ही पात्र आहोत. विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करू नये. तथ्यहीन आरोप सहन करून घेणार नाही   असेही नगराध्यक्षा रघुवंशी यांनी स्पष्ट केले.  सभेत 18 विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. त्यात पालिका क्षेत्रातील मतदारांच्या जनता अपघात विमा नूतनीकरण करणे. आर्थिक वर्षात जादा वसूल झालेल्या रकमांचे समायोजन करणे, अवधूत पार्क, मनुदेवी पार्कच्या मोकळ्या जागेत चेनलिंक फेसिंग ची कामे करणे, बेघर घटकासाठी देखभाल व व्यवस्थापन खर्च मंजूर करणे, साक्री नाका ते तलावपाडा भिलाटी पयर्ंतचे रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण, रस्ता दुभाजक व गटार बांधकाम कामास मुदतवाढ देणे, नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत शासनाकडे निधी मागणीसाठी विकास कामांचे प्रस्ताव सादर करणे, घनकचरा प्रकल्पस्थळी बायो मायनिंग या कामास मुदतवाढ मिळणे, स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव स्थळी नवीन रोहित्र बसविणे व अतिरिक्त कामे करणे, पालिका कर्मचा:यांसाठी ड्रेस कोड लागू करणे, स्वच्छतेच्या कामांसाठी नवीन मोजमाप नुसार सुधारित अंदाजपत्रक तयार करणे, पालिकेच्या विभागांसाठी कुशल,अकुशल, तांत्रिक, प्रशासकीय कर्मचारी बाह्य संस्थेमार्फत पुरवण्याच्या कामास मंजुरी मिळणे आदी विषयांचा त्यात समावेश आहे.