५० पेक्षा अधीक गावांचा घसा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:04 IST2020-05-14T10:04:10+5:302020-05-14T10:04:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाशी लढतांना आता प्रशासनाला पाणी टंचाईच्या उपाययोजनांकडेही लक्ष द्यावे लागत आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यातील ...

Dry throats of more than 50 villages | ५० पेक्षा अधीक गावांचा घसा कोरडा

५० पेक्षा अधीक गावांचा घसा कोरडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाशी लढतांना आता प्रशासनाला पाणी टंचाईच्या उपाययोजनांकडेही लक्ष द्यावे लागत आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यातील ५० पेक्षा अधीक गावे पाणी टंचाईने होरपळत आहेत. तेथे उपाययोजनांसाठी प्रशासनाची कसरत होत आहे.
जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधीक पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची स्थिती राहणार नाही अशी शक्यता होती. परंतु अनेक भागात पाणी अडवून ते भुगर्भात जिरविण्याची सोय नसल्यामुळे बऱ्याच गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. यंदाची स्थिती देखील तशीच आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील गावे आणि सातपुड्यातील डोंगर दºयातील गावांमधील ही स्थिती आहे.
आता मिळाली गती
कोरोनाची दहशत आणि लॉकडाऊन यामुळे शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती जेमतेम राहत होती. परिणामी पाणी टंचाईच्या उपाययोजनांना गती मिळत नव्हती. आता टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागल्याने व ग्रामस्थांकडूनही ओरड होऊ लागल्याने प्रशासनाला हालचाल करावी लागत आहे. लोकप्रतिनिधी देखील अधिकाºयांना याबाबत धारेवर धरत असल्यामुळे कुपनलिकांना हातपंप बसविणे, कुपनलिका दुरूस्त करणे, खाजगी विहिर अधिग्रहण करणे अशा उपाययोजनांना सुरुवात झाली आहे.
५० पेक्षा अधीक गावे
जिल्ह्यातील १ लाख दोन हजार ९१२ लोकसंख्येच्या ४८ गावे व ११ पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
नंदुरबार तालुक्यातील ५७,३२७ लोकसंख्येच्या २४ गावांमध्ये टंचाई आहे. उपाययोजनांमध्ये सर्वच २४ ठिकाणी विहिर अधिग्रहण प्रस्तावीत आहे. त्यावर कामे सुरू आहेत.
नवापूर तालुक्यातील १२,०१२ लोकख्येंच्या १५ ग्रामपंचायतीची सहा गावे व ९ पाड्यांमध्ये ९ ठिकाणी विहिर अधीग्रहण तर ६ ठिकाणी विंधन विहिर घेण्यात येणार होत्या. शहादा तालुक्यातील २९,०२३ लोकसंख्येच्या १२ गावांमध्ये कुपनलिका खोदण्यात येणार होत्या. अक्लककुवा तालुक्यातील ३,४२४ लोकसंख्येच्या ४ गावांमध्ये चारही ठिकाणी विंधन विहिर खोदण्यात येणार आहेत.
धडगाव तालुक्यात १,१२६ लोकसंख्येच्या दोन गावे व दोन पाड्यांमध्ये दोन ठिकाणी विहिर अधिग्रहण तर दोन ठिकाणी टँकर प्रस्तावीत आहे.
भौगोलिक अडसर
पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी अनेक भागात भौगोलिक अडसर देखील येत आहेत. सातपुड्यातील काही गाव व पाड्यांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत. साधी पायवाट आहे. अशा ठिकाणी कुपनलिका खोदण्याचे मशीन जावू शकत नाही. दुर्गम भागात नळपाणी पुरवठा योजना राबविणे देखील अडचणीचे आहे. सौर पंपाद्वारे काही ठिकाणी तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाल्या. परंतु सौर पॅनेल खराब झाल्यामुळे देखील अशा ठिकाणी या योजना ठप्प पडल्या आहेत.


सातपुड्यातील अनेक भागातील ग्रामस्थ दऱ्याखोऱ्यांमधील झºयांमधील पाण्यावर आपली तहान भागवत आहेत.
गेल्यावर्षी सातपुड्यातील तळोदा तालुक्यतील काही गावे पाड्यांना पाणी पुरवठ्याची कुठलीही सोय नसल्याने गाढवावरून पाणी न्यावे लागून त्या गावातील लोकांची तहान भागवावी लागली होती.
गेल्यावर्षी टंचाई कृती आराखडाअंतर्गत करण्यात आलेल्या कुपनलिकांना तातडीने हातपंप बसविण्यासाठी ग्रामिण पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

 

Web Title: Dry throats of more than 50 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.