उत्तर महाराष्ट्रात कोरडे व उष्ण हवामानाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:35 IST2018-10-04T12:35:32+5:302018-10-04T12:35:39+5:30
उत्तर महाराष्ट्राची स्थिती : परतीच्या पावसाचा पट्टा महाराष्ट्राच्या सिमेत दाखल

उत्तर महाराष्ट्रात कोरडे व उष्ण हवामानाचा अंदाज
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात 10 ऑक्टोबर्पयत उष्ण व कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे व्यक्त करण्यात आला आह़े वेस्ट राजस्थानपासून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असून अरबी समुद्राच्या इस्ट सेंट्रलपासून निघालेली परतीच्या पावसाचा पट्टा कोकण, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, गोंदीया अशा मार्गाने मध्य प्रदेशातून गेला आह़े
जळगाव जिल्ह्याला लागून परतीच्या पावसाचा पट्टा गेलेला असला तरीसुध्दा काही दिवस जळगावसह उत्तर महाराष्ट्राचे हवामान उष्ण राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’च्या शास्त्रज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वेस्ट राजस्थानपासून 29 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान, परतीच्या पावसाने सुरुवात केलेली आह़े परतीच्या पावसाचा पट्टा बुधवारपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून गेला आह़े यामुळे येत्या काही दिवसात राज्यातील बरेचसे जिल्हे यातून प्रभावित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े
परतीच्या पावसाचा पट्टा येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े सध्या उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या प्रमाणात अधिक वाढ होत आह़े त्याच प्रमाणे नंदुरबारात बुधवारी तब्बल 45 टक्के आद्रतेचे प्रमाण नोंदविण्यात आले आह़े अरबी समुद्रातून येणा:या बाष्पामुळे यात काही दिवसात अधिक वाढ होणार असल्याची माहिती आह़े
यंदा नंदुरबार जिल्ह्यात सरासरी केवळ 67 टक्के इतकाच पाऊस झालेला आह़ेअद्याप पावसाची 30 टक्के तुट भरुन काढणे बाकी आह़े नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केल्यास परतीच्या पावसापासून फार काही लाभ झालेला आहे, असे नाही़ त्यामुळे मुख्य पावसाळी दिवसांवरच जिल्ह्यातील पजर्न्यमानाची स्थिती अवलंबून असत़े यंदा परतीच्या पावसालाही उशिर होणार असल्याचे हवामान खात्याकडून आधीच सांगण्यात आले होत़े त्यामुळे साहजिकच नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात परतीचा पाऊस पूर्णपणे व्यापण्यासाठी अजूनही काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आह़े
जिल्ह्याच्या तापमानात वाढ
दरम्यान, गेल्या आठवडय़ापासून जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून बुधवारी 39 अंश सेल्शिअसर्पयत नंदुरबारचे तापमान जावून पोहचले आह़े त्यामुळे सर्वसामान्य चांगलेच हवालदिल झालेले आहेत़ परतीच्या पावसासाठी अद्यापही प्रतीक्षा करावी लागणार असल्याने याचा परिणाम आता पिकांवरही जाणवनार असल्याचे चित्र स्पष्ट आह़े
परतीच्या पावसाचा
कालावधी वाढणार
सर्वसाधारणपणे 1 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला वेस्ट राजस्थानपासून सुरुवात होत असत़े परंतु परती पाऊस नेहमीच लेटलतिफ असतो़ त्यामुळे साहजिकच त्याचा जाण्याचा कालावधीही वाढत आह़े साधारणत: नोव्हेंबरच्या शेवटार्पयत परतीचा पावसाचा कालावधी संपण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े परंतु यातून प्रत्यक्षा पजर्न्यमानाचे प्रमाण किती असते, हे बघणे महत्वाचे ठरणार आह़े