दारुच्या नशेत एकावर कु:हाडीने वार करणा:यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:48 IST2019-09-26T11:48:49+5:302019-09-26T11:48:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दारुच्या नशेत कु:हाडीने वार करुन एकास गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री 10 वाजेच्या ...

Drunk Bitter: Arrested On Drunk Drinking | दारुच्या नशेत एकावर कु:हाडीने वार करणा:यास अटक

दारुच्या नशेत एकावर कु:हाडीने वार करणा:यास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दारुच्या नशेत कु:हाडीने वार करुन एकास गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास चिरडे ता़ शहादा येथे घडली़ संशयितास पोलीसांनी अटक केली आह़े 
हुरज्या चामा:या ठाकरे असे संशयित आरोपीचे नाव असून त्याने गुरवा नु:या ठाकरे रा़ चिरडे याच्यावर कु:हाडीने वार केले होत़े सोमवारी रात्री हुरज्या हा दारु प्यायलेला असल्याने बडबड करत होता़ यावेळी गुरवा याने बडबड करु नको, जेवण करुन झोपून जा, असे सांगितले होत़े याचा राग आल्याने हुरज्या याने त्याच्या जवळील धारदार पात्याच्या कु:हाडीने गुरवा याच्या चेह:यावर वार करुन गंभीर दुखापत केली़ रात्री उशिरा गुरवा ठाकरे याने म्हसावद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन हुरज्या ठाकरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक धात्रक करत आहेत़ संशयित हुरज्या यास पोलीस पथकाने मंगळवारी रात्री अटक केली़ बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आल़े जखमीवर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ 
 

Web Title: Drunk Bitter: Arrested On Drunk Drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.