नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यात दुष्काळ जाहिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 17:43 IST2018-11-02T13:34:08+5:302018-11-02T17:43:45+5:30

नंदुरबार : पावसाने ओढ दिलेल्या चार तालुक्यात दुष्काळ परिस्थिती जाहिर करण्यात आली आह़े या तालुक्यात विविध सवलती अधिकृतपणे लागू ...

Drought in four talukas of Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यात दुष्काळ जाहिर

नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुक्यात दुष्काळ जाहिर

नंदुरबार : पावसाने ओढ दिलेल्या चार तालुक्यात दुष्काळ परिस्थिती जाहिर करण्यात आली आह़े या तालुक्यात विविध सवलती अधिकृतपणे लागू करण्यास शासनाने मंजूरी दिली आह़े 
यंदाच्या खरीप हंगामात नंदुरबार, नवापूर, शहादा आणि तळोदा या चार  तालुक्यात शासनाने दुष्काळ परिस्थिती जाहिर केली असून या तालुक्यांना विविध सवलती देण्यात आल्या आहेत़ 
यात चारही तालुक्यातील सर्व गावांमध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुर्नगठन, कृषी पंपांच्या चालू विज बिलात 33 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्याथ्र्याच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतक:यांच्या शेतीच्या पंपांची वीज जोडणी खंडीत न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ 
चार तालुक्यातील एकूण 596 गावे या दुष्काळ सवलतींना पात्र ठरली आहेत़ जिल्हा प्रशासनाकडून याबाबत वेळावेळी आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 
 

Web Title: Drought in four talukas of Nandurbar district