जीप अपघातात चालकाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:14 IST2019-11-29T12:14:03+5:302019-11-29T12:14:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना शहादा तालुक्यातील ...

जीप अपघातात चालकाचा जागीच मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना शहादा तालुक्यातील अंबापूर ते राणीपूर रस्त्यावर 27 रोजी घडली.
सुनील लालसिंग चौधरी (28) रा.तोरणमाळ, ता.धडगाव असे मयताचे नाव आहे. सुनील चौधरी हे आपल्या ताब्यातील जीप भरधाव चालवून राणीपूरकडे जात होते. वळणावर त्यांचे नियंत्रण सुटल्याने जीप उलटली. चौधरी यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत सुनिता लालसिंग चौधरी यांनी फिर्याद दिल्याने म्हसावद पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तपास जमादार धात्रक करीत आहे.