ट्रॅक्टरखाली दाबला गेल्याने चालकाचा मृत्यू

By Admin | Updated: January 8, 2017 23:53 IST2017-01-08T23:53:05+5:302017-01-08T23:53:05+5:30

आष्टे येथील घटना : मयताविरोधात गुन्हा

Driver dies after being under the tractor | ट्रॅक्टरखाली दाबला गेल्याने चालकाचा मृत्यू

ट्रॅक्टरखाली दाबला गेल्याने चालकाचा मृत्यू

नंदुरबार : तालुक्यातील आष्टे येथे ट्रॅक्टरखाली दाबला गेल्याने चालक गंभीर जखमी झाला होता़ या चालकाचा सुरत येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आह़े मयत चालकाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आह़े 
आष्टे येथील शंकर आत्माराम ठाकरे हा  14 डिसेंबर 2016  रोजी आष्टे शिवारातील दत्तू राजाराम गाठे यांच्या शेतात ट्रॅक्टर क्रमांक एमएच़़39 एफ 4967 शेतीकामासाठी घेऊन गेला असता, त्याने शेताच्या बांधावर ट्रॅक्टर चालवल्याने ते जागीच उलटले होत़े या ट्रॅक्टरच्या ट्रॅालीखाली शंकर ठाकरे दाबला गेल्याने गंभीर जखमी झाला होता़ त्यास सुरत येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होत़े उपचारादरम्यान ठाकरे याचा शनिवारी मृत्यू झाला़ यानंतर कागपत्रांची पूर्तता झाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे  पोलीस हेड कॉन्स्टेबल यशवंत वसावे यांच्या फिर्यादीवरून मयत चालक शंकर ठाकरे याच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े

Web Title: Driver dies after being under the tractor