डामरखेडानजीक ट्रॅक्टर अपघातात चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 12:00 IST2019-02-21T11:59:48+5:302019-02-21T12:00:14+5:30
प्रकाशा : प्रकाशा-शहादा रस्!यावर डामरखेडानजीक जाणारे रिकामा टॅक्टर व ट्रॉली रस्त्याच्या खाली ३० फुट खोल शेतात घसरून झालेल्या अपघातात ...

डामरखेडानजीक ट्रॅक्टर अपघातात चालक ठार
प्रकाशा : प्रकाशा-शहादा रस्!यावर डामरखेडानजीक जाणारे रिकामा टॅक्टर व ट्रॉली रस्त्याच्या खाली ३० फुट खोल शेतात घसरून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.
चालक जिवन भिल रा.दहिवद ता.शिरपूर असे मयताचे नाव आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. दुर्गा खांडसरी पानसेमल येथील ट्रॅक्टर व ट्रॉली ऊसाची वाहतूक करतात. नेहमीप्रमाणे ऊस भरण्यासाठी जात असतांना ट्रॅक्टर ट्रॉलीसह गोमाई पुलानजीक थेट रस्त्याच्या खाली ३० फुट खोल शेतात घसरले. त्यात चालक हा ट्रक्टर खाली दाबला गेल्याने जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक दिपक बागूल ,हवालदार गौतम बोराळे, वंतू गावित, होमगार्ड आदींसह डामरखेडा चे पोलीस पाटील शिंदे घटनास्थळी दाखल झाले. मृताचे शव बाहेर काढले तसेच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली व मृताचे शव म्हसावद ग्रामिण रूग्णालयात पाठवण्यात आले.