काळंबाजवळ पिकअप उलटून चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:13 IST2019-06-18T21:12:23+5:302019-06-18T21:13:35+5:30
नंदुरबार : तालुक्यातील काळंबा फाटय़ाजवळ भरधाव वेगातील वाहन उलटून चालक ठार तर एकजण गंभीर जखमी झाला़ सोमवारी रात्री 10़30 ...

काळंबाजवळ पिकअप उलटून चालक ठार
नंदुरबार : तालुक्यातील काळंबा फाटय़ाजवळ भरधाव वेगातील वाहन उलटून चालक ठार तर एकजण गंभीर जखमी झाला़ सोमवारी रात्री 10़30 वाजता हा अपघात घडला़
काळंबा फाटय़ाजवळून भरधाव वेगात जाणा:या एमएच 18 बीजी 2354 या पिकअप वाहनचा डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला़ यामुळे अनियंत्रित झालेले पिकअप वाहन रस्त्याच्या बाजूला उलटल़े यात वाहनातील एकजण बाहेर फेकला गेला तर चालक रविंद्र देविदास मोरे रा़ बलवाडी ता़ वरला जि़ बडवाणी हा वाहनाखाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ कालू उखडू राठोडयाने दिलेल्या फिर्यादीवरुन चालक रविंद्र मोरे याच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े