ट्रॅक्टर अपघातात ऊस अंगावर पडून चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 12:48 IST2021-01-29T12:48:25+5:302021-01-29T12:48:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव ट्रॅक्टर व ट्रॅालीचे चेसीस तुटल्याने ट्रॅालीमधून ऊस अंगावर पडून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ...

ट्रॅक्टर अपघातात ऊस अंगावर पडून चालक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव ट्रॅक्टर व ट्रॅालीचे चेसीस तुटल्याने ट्रॅालीमधून ऊस अंगावर पडून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना परिवर्धा ते काथर्दे दिगर रस्त्यावर घडली. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाश गवल्या वसावे, रा.काथर्दे दिगर, ता.शहादा असे मयताचे नाव आहे. प्रकाश वसावे हे त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्रमांक एमएच २६-एएफ ३३९०) ऊस भरून घेऊन जात असतांना ट्रॅक्टरची चेसीस तुटली. त्यामुळे ट्रॅालीतील ऊस चालक प्रकाश वसावे यांच्या अंगावर पडला. त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. वण्या गवल्या वसावे यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.