मृगजळ ठरलेल्या मेडीकल कॅालेजचे स्वप्न अखेर पुर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 12:57 PM2020-10-29T12:57:34+5:302020-10-29T12:59:08+5:30

वातार्पत्र- नंदुरबार मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या १५ वर्षापासून मृगजळ ठरलेल्या नंदुरबार जिल्हावासीयांचे मेडीकल कॅालेजचे स्वप्न ...

The dream of a mirage medical college has finally come true | मृगजळ ठरलेल्या मेडीकल कॅालेजचे स्वप्न अखेर पुर्ण

मृगजळ ठरलेल्या मेडीकल कॅालेजचे स्वप्न अखेर पुर्ण

Next

वातार्पत्र- नंदुरबार

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या १५ वर्षापासून मृगजळ ठरलेल्या नंदुरबार जिल्हावासीयांचे मेडीकल कॅालेजचे स्वप्न अखेर पुर्ण झाले आहे. एकदाची केंद्राची परवाणगी मिळाली असून आता यंदापासून प्रवेश प्रक्रीया सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राने मंजुर केलेले १९५ कोटी लवकर मिळणे आणि राज्य शासनाचा १३० कोटी रुपयांचा हिस्सा लवकर मंजुर होणे या दोन बाबी पुर्ण होण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. 
नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवा पांगळी आहे. दुर्गम भागातील आरोग्य सेवेचे नेहमीच वाभाडे निघाले आहेेत. दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी येतो. कागदोपत्री खर्च होतो, परंतु आरोग्य सेवा सुधारण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नंदुरबारात मेडीकल कॅालेज मंजुर करून त्या माध्यमातून किमान जिल्हास्तरावर तरी चांगली आरोग्य सेवा मिळावी असे प्रयत्न होते. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे नेते आमदार डॅा.विजयकुमार गावीत यांनी मेडीकल कॅालेज मंजुर केले होते. परंतु इन्फ्रास्टक्चरची वाणवा, निधी मंजुर होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा आणि राजकीय इच्छाशक्ती यांच्या अभावामुळे हे महाविद्यालय रद्द झाले. नंतर भाजप सरकार सत्तेवर आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी नंदुरबारातील आरोग्य मेळाव्यात नंदुरबार आणि जळगावच्या मेडीकल कॅालेजची घोषणा केली. जळगावचे मेडीकल कॅालेज वर्षभरात सुरू झाले. परंतु नंदुरबारच्या कॅालेजसाठी पुन्हा सहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. गेल्या वर्षभरापासून मात्र या कॅालेजच्या सुरू होण्याच्या प्रक्रीयेला वेग आला होता. खासदार डॅा.हिना गावीत यांनी केंद्रात आवश्यक तो पाठपुरावा कायम ठेवला. परिणामी सिव्हीलचे हस्तांतरण, डीनची नेमणूक, जागा, आवश्यक स्टाफ नियुक्ती आणि केंद्रीय समितीने वेळोवेळी काढलेल्या त्रुटी पुर्ण करण्याला वेग आला. खासदार हिना गावीत यांनी खास बाब म्हणून कॅालेजसाठी केंद्राचा हिस्सा असलेल्या १९५ कोटी रुपयांची मंजुरी देखील मिळवून घेतली. डीन डॅा.शिवाजी सुक्रे यांनी यासाठी वेळोवेळी त्रुटींची पुर्तता करण्यासाठी मेहनत घेतली. त्यामुळे यंदा हे कॅालेज सुरू होईल अशी अपेक्षा लागून होती ती आता पुर्ण झाली आहे.
मेडीकल कॅालेजसाठी १६.१६३ हेक्टर जागा ही टोकरतलाव शिवारात मिळालेली आहे. सिव्हीलचे ३०० बेड आणि महिला हॅास्पीटलचे २०० बेड असे ५०० बेड आज उपलब्ध आहेत. सिव्हीलचे पुर्ण हस्तांतरण झालेले आहे. आवश्यक स्टाफ अर्थात प्रोफेसर व इतर अधिकारी यांची प्रतिनियुक्ती झालेली आहे. केंद्राच्या हिस्स्याचे १९५ कोटी कधीही कॅालेजच्या खात्यावर येतील. राज्याच्या हिस्स्याचे १३० कोटींबाबत मात्र राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत अद्याप चर्चा झालेली नाही. पालकमंत्र्यांनी खास बाब म्हणनू हा विषय मार्गी लावणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी डीपीडीसीने मंजुर केेलेले तीन कोटी पैकी केवळ सव्वा कोटी रुपये मिळालेले आहेत. डीपीडीसीमध्ये मेडीकल कॅालेजचे हेड तयार झालेले नाही ते होणे आवश्यक आहे. या सर्व बाबींसाठी पालकमंत्री व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. यंदा एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रीया होण्यासाठी आवश्यक तयारी पुर्ण झालेली आहे. त्यामुळे मेडीकल कॅालेजचे जिल्हावासीयांचे स्वप्न आता पुर्णत्वास आलेले आहे. या माध्यमातून जिल्हावासीयांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचीही अपेक्षा आहेच.

Web Title: The dream of a mirage medical college has finally come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.