ड्रेनेजचे चेंबर फुटले, चार दिवसांपासून हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:29 IST2020-09-14T12:29:49+5:302020-09-14T12:29:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील शिवाजी रोडवरील यार्दीचे राममंदीर ते धोशा तकीया पर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी ड्रनेजचे चेंबर फुटले ...

ड्रेनेजचे चेंबर फुटले, चार दिवसांपासून हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील शिवाजी रोडवरील यार्दीचे राममंदीर ते धोशा तकीया पर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी ड्रनेजचे चेंबर फुटले असून घाण पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. या परिसरातील नागरिकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.
नंदुरबारातील मुख्य रहदारीचा रस्ता असलेल्या शिवाजीरोडवर यार्दीचे राममंदीर ते धोशा तकीया या दरम्यानचा रस्ता आधीच प्रचंड खराब झाला आहे. खड्ड्यातून वाहनचालकांना वाट काढावी लागते. अक्षरश: चाळणी झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी ड्रेनेजचे चेंबर फुटले आहे. त्यामुळे चार दिवसांपासून घाण पाणी रस्त्यातून वाहत आहे. त्याच घाण पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. या भागात मंदीर, हॉटेल्स व घरे आहेत. शिवाय २४ तास रस्ता रहदारीचा आहे. असे असतांनाही याबाबत पाकिलेने गांभिर्याने घेतलेले नाही. घाणी पाणी आणि दुर्गंधी यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.