डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींचा गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST2021-08-12T04:34:18+5:302021-08-12T04:34:18+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. परीक्षित मोडक होते. कार्यक्रमास उपाध्यक्ष नरेंद्र सराफ, सचिव प्रशांत पाठक, कार्यकारिणी सदस्य ...

डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींचा गुणगौरव
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. परीक्षित मोडक होते. कार्यक्रमास उपाध्यक्ष नरेंद्र सराफ, सचिव प्रशांत पाठक, कार्यकारिणी सदस्य श्रीराम मोडक व मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा, खाज्या नाईक, तंट्या भिल व बालशहीद शिरीषकुमार यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आले. दहावीच्या परीक्षेसाठी शाळेतून १५१ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्या सर्व उत्तीर्ण झाल्याने शाळेचा निकाल १०० टक्के लागला. त्यात गायत्री रंगनाथ बागुल (९५.६० टक्के) प्रथम, द्वितीय महिमा राजेंद्र तांबोळी (९२ टक्के) तर तृतीय क्रमांक प्राची राजेश चौधरी (९१.६० टक्के) हिने पटकावला. त्याचप्रमाणे आठवीच्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक दुर्बल घटकातून घेतल्या जाणाऱ्या एन.एम.एम.एस. परीक्षेत जान्हवी बजाज व अंबिका वळवी या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. या विद्यार्थिनींचा व पालकांचा गौरव व सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक हेमंत बोरसे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल नाईक यांनी तर आभार महेश भट यांनी मानले.