डाॅ.गौरव तांबोळी यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST2021-08-01T04:28:23+5:302021-08-01T04:28:23+5:30

रांझणी : तळोद्याचे सुपुत्र तसेच नंदुरबार येथील स्मित हाॅस्पिटलचे डाॅ.गौरव तांबोळी यांना कोविड महामारीच्या काळात नंदुरबार जिल्ह्यात उत्कृष्ट प्रकारे ...

Dr. Gaurav Tamboli honored by the Governor | डाॅ.गौरव तांबोळी यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

डाॅ.गौरव तांबोळी यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

रांझणी : तळोद्याचे सुपुत्र तसेच नंदुरबार येथील स्मित हाॅस्पिटलचे डाॅ.गौरव तांबोळी यांना कोविड महामारीच्या काळात नंदुरबार जिल्ह्यात उत्कृष्ट प्रकारे सेवा देत अनेकांचे प्राण वाचविल्याबद्दल नवभारत हेल्थकेअर अवॉर्डमध्ये एक्सलन्स इन कोविड केअर या श्रेणीतून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

डाॅ.गौरव तांबाेळी हे तळोदा शहरातील सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी यांचे सुपुत्र असून, त्यांचे शिक्षण एम.बी.बी.एस., एम.डी मेडिसिन पर्यंत आहे. ते मुंबईतील जसलोक या नामांकित हाॅस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देत असताना नंदुरबार जिल्ह्यात कोरोना महामारीचे संकट लक्षात घेत जिल्हावासीयांच्या सेवेसाठी नोकरी सोडून येत जिल्ह्यातील पहिले व्हेंटिलेटरसह आयसीयू, आयपीडी, ओपीडी उपचार सुविधा असलेले स्मित मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल सुरू करीत जवळपास ५०० रुग्णांना जीवदान देण्याचे कार्य केले.

डाॅ.तांबोळी यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल तळोदा तालुक्यातील नागरिकांसह वैद्यकीय, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मंडळींसह विद्या सहयोग बहुउद्देशीय संस्थेतील कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

Web Title: Dr. Gaurav Tamboli honored by the Governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.