सटीपाणीजवळ दुहेरी हत्याकांडाने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 12:21 IST2019-02-26T12:20:38+5:302019-02-26T12:21:17+5:30
हिस्से वाटणीवरून वाद : घरेही जळाली; 12 जणांविरूद्ध गुन्हा दाखल; सात जण अटकेत

सटीपाणीजवळ दुहेरी हत्याकांडाने खळबळ
मंदाणे : शहादा तालुक्यातील सटीपाणी गावाजवळील शेत शिवारात हिस्से वाटणीच्या वादातून शेतातील घरावर जमावाने अचानक हल्ला चढवून व घराला आग लावून घरातून घाबरून बाहेर पडलेल्या बाप-लेकांना धारदार शस्त्रांनी वार करून जिवेठार मारल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या दुहेरी हत्याकांडाने परिसर हादरला असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या खळबळ उडवून देणा:या घटनेप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात 12 जणांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, यापैकी सात आरोपींना तत्काळ ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळविले.
पोलीस सूत्रानुसार, शहादा तालुक्यातील सटीपाणी हे गाव भुलाणे ग्रुपग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येते. सटीपाणीला लागूनच गोटाळी रस्त्याकडे कंजाण्यापाडा आहे. या पाडय़ाच्या जवळच शेतात फुलसिंग रामा पावरा (60) हे पत्नी, मुले, सुना व नातवंडासह कुडाचे घर तयार करून तेथे राहत होते. फुलसिंग पावरा यांना अंग्रेशा रामा पावरा हे सावत्र भाऊ आहेत. तेही परिवारासह सटीपाणी गावात राहात होते. या दोन्ही भावांमध्ये शेतीच्या हिस्से वाटणी वरून ब:याच दिवसापासून वाद होता.
फुलसिंग पावरा व अंग्रेशा पावरा यांच्यातील शेतीचा हिस्से वाटणीच्या वादामुळे दिवसेंदिवस तणाव वाढत होता. फुलसिंग पावरा यांच्या वाटय़ाला जास्त शेती गेली. माझा परिवार मोठा असून, मला हिस्सा कमी मिळाला, असे अंग्रेशा पावरा यांचे म्हणणे होते असे, मांगीलाल फुलसिंग पावरा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कमी हिस्स्यामुळे अंग्रेशा पावरा यांना राग होता. त्यामुळे वाद विकोपाला पोहोचला.
रविवार 24 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास फुलसिंग पावरा यांच्या शेतात अंग्रेशा पावरा यांची गुरे घुसली. यावरून दोन्ही गटात वाद उफाळला. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. अंग्रेशा पावरा व त्यांच्या सहका:यांनी फुलसिंग पावरा यांच्या दोन्ही घरांना बाहेरून आग लावली. सर्व कुटुंबिय घाबरले. घरातील सर्वानीच जीव वाचविण्यासाठी घराबाहेर येवून मिळेल त्या दिशेने पळ काढला. त्यावेळी फुलसिंग पावरा व धर्मा फुलसिंग पावरा हेही घराबाहेर पडले. त्याच वेळी आरोपींनी या दोघांवर हल्ला चढवित कु:हाड, धा:या, कोयता, तिरकामठा अशा धारदार शस्त्रांनी घाव घातले. यात दोघे बाप-लेक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या थरकाप उडवून देणा:या घटनेची माहिती भुलाणे पोलीस पाटील संतोष पावरा यांनी शहादा पोलीस ठाण्याला दिली. घटनेचे वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, असलोद दूरक्षेत्राचे हवालदार अशोक कोळी, दीपक परदेशी, पोलीस नाईक, बलविंदर ईशी, अरूण चव्हाण, करणसिंग वळवी, संदीप पाटील व शहादा पोलीस कर्मचारी घटनास्थळाकडे तत्काळ रवाना झाले.
या वेळी दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी सटीपाणी येथे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.