Double loyalty has no place | दुहेरी निष्ठा असणाऱ्यांना स्थान नाही

दुहेरी निष्ठा असणाऱ्यांना स्थान नाही


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्टÑवादीत आतापर्यंत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे दुहेरी निष्ठा राखणारे होते. त्यामुळे पक्षाची वाढ होत नव्हती. आता दुहेरी निष्ठा असणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल. तसेच नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्टÑवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले, गेल्या काही वर्षापासून पक्षात दुहेरी निष्ठा असणारे होते. सकाळी राष्टÑवादीच्या व्यासपीठावर तर सायंकाळी दुसºया पक्षाच्या व्यासपीठावर ही मंडळी दिसत होती. त्यामुळे पक्ष वाढ खुंटली होती. सोयीचे राजकारण ही मंडळी करीत होती. आता मात्र, या प्रकाराला पक्षात थारा राहणार नाही. जे पदाधिकारी, कार्यकर्ते असे वागतील त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
पक्षात आता दोन गट राहणार नाही यासाठी प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वसमावेशक कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. सर्व घटकांना त्यात सामावून घेतले जाईल.
जिल्हा परिषदेत राष्टÑवादीचे तीन सदस्य हे भाजपच्या गटात सामिल आहेत. तसा गट स्थापन झाला आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
पक्षात येण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. परंतु परस्पर कुणालाही प्रवेश देऊ नये, जिल्हा प्रभारी, स्थानिक पदाधिकारी यांना विश्वासात घेतले जावे अशी अपेक्षा वरिष्ठांकडे केली आहे. चारही विधानसभा मतदारसंघात पक्षाचे कार्य वाढविण्यात येणार आहे. या कार्याच्या बळावरच यापुढे विधानसभेच्या दोन जागा सुटतीलच असा आपल्याला विश्वास असल्याचेही डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले.
यावेळी शांतीलाल साळी, मधुकर पाटील, रवींद्र पाटील उपस्थित होते.
 

Web Title: Double loyalty has no place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.