कोरोनाच्या धास्तीला उपाययोजनांचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 12:16 IST2020-03-16T12:16:30+5:302020-03-16T12:16:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी दक्षता म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला ...

कोरोनाच्या धास्तीला उपाययोजनांचा डोस
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी दक्षता म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे़ यांतर्गत सोमवारपासून विविध कामांना वेग येणार असून नागरिकांची भिती दूर करण्यासाठी प्रशासनाकडून २४ तास कक्षांची निर्मिती करण्यात येत आहे़
जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन २००५ चा कायदा लागू केला आहे़ यांतर्गत गर्दी होऊ शकणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे़ या पार्श्वभूमीवर आता जनजागृती हा मोठा आधार असल्याने प्रशासन सोमवारपासून सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यात प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयात सोमवारी सनियंत्रण कक्षाची निर्मिती करुन त्याठिकाणी समुपदेशक, वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित नर्स असे पाच ते सात लोकांचे पथक नियुक्त करण्यात येणार आहे़ या कक्षात टोल फ्री क्रमांक देण्यात येणार असल्याची माहिती असून येत्या काळात या कक्षातून जिल्ह्यातील नागरिकांची भिती घालवण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने येत्या आठवड्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले होते यानुसार अधिकारी व कर्मचाºयांच्या नियुक्त्या होणार आहेत़ वैधमापन शास्त्र विभागाच्या स्वतंत्र पथकांची निर्मिती करुन जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, सर्जिकल साहित्याची रिटेल व होलसेल विक्री करणारे विक्रेते यांची तपासणी करण्यात येणार आहे़ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास गरज म्हणून खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स अधिग्रहीत करणे, स्वतंत्र रुग्णवाहीका तयार ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क विक्री वाढली असल्याने बोगस मास्क विक्री होऊ नयेत यासाठी वैधमापन विभागाचे पथक व जिल्हा केमिस्ट असोसिएशन यांच्यात चर्चा सुुरु असून सोमवारपासून पुन्हा भरारी पथक तपासण्या पूर्ण करणार आहेत़ सोबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जिल्ह्यातील खाद्यपदार्थ विक्रेते, खाद्यपदार्थ तयार करण्यात येणार कारखाने येथे भेटी देऊन तपासणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शासनाकडून अन्न व औषध प्रशासनाला तसे आदेश पारित करण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली आहे़ खाद्यपदार्थ विक्री करणाºयांची जागृती करण्याबाबत नागरिकांनीही सूचना केल्या होत्या़ पोलीस दलाच्या गृह शाखेकडून रविवारीही परदेशात गेलेले व परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती काढण्यात येत होती़ या नागरिकांच्या तपासण्या करण्यावर भर दिला जाणार असल्याने गृह शाखेकडून माहिती मागवली जात आहे़ सोबत सायबरसेल सोशल मिडियावर लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे़
प्रशासनाने वेळापत्रक तयार करुन कामांना सुरुवात करणार असल्याचे म्हटले असले तरी तरी रविवारी मात्र बºयाच ठिकाणी शुकशुकाट असल्याचे चित्र होते़ पाच दिवसांच्या आठवड्यामुळे जनजागृती व इतर कामांना ब्रेक लागल्याचीही स्थिती होती़ एकीकडे प्रशासकीय कामांची गती संथ असताना दुसरीकडे रविवार जिल्ह्यात शुकशुकाट वार ठरल्याचे चित्र होते़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृहे आणि कार्यक्रमांना बंदी करण्यात आल्यानंतर नागरिक घरीच बसून होते़ नंदुरबार शहरातील कोकणी हील परिसरातील मल्टीप्लेक्स सिनेमागृह सामसूम होते़ शहरातील रस्तेही ओस पडले होते़ काही ठिकाणी विवाह सोहळे असल्याने गर्दी होती़ परंतू कोरोनाच्या भितीने वेळेवर लग्न आटोपून नागरिक घराकडे जाणे पसंत करत होते़ जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही शुकशुकाट होता़
मांसाहारी पदार्थ आणि कोरोना यांचा संबध जोडला जात असल्यामुळे हॉटेल व्यावसायावरही परिणाम झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांनी नॉन व्हेजचे पदार्थ निम्म्यावर कमी केले आहे. आॅर्डरच राहत नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणने आहे. त्यामुळे शाकाहारी पदार्थांना मागणी वाढली असली तरी मांसाहारी पदार्थांचे खवैय्ये जास्त असल्याचे एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले.
अशीच स्थिती मटन मार्केटमध्ये देखील दिसून येत आहे. मटन, चिकन यांची विक्री निम्म्यावर आली आहे. अंडी ला देखील उठाव नसल्याचे दिसून येत आहे. अंड्यांचा एका ट्रे मागे ३० ते ४० रुपये कमी झाले आहेत. येत्या काळात ही परिस्थिती कायम राहणार असल्यामुळे हॉटेल व्यावसायिक धास्तावले आहेत.
कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी लागू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे़ सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असली तरी आठवडे बाजारांबाबत निर्णय झालेला नसल्याचे समजते़ येत्या मंगळवारी शहादा आणि नंदुरबार या दोन ठिकाणी तर त्यानंतर शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात ठरलेल्या दिवशी आठवडे बाजार भरणार आहेत़ आठवडे बाजारांमध्येही पथकांकडून नागरिकांची जागृती करण्यावर देण्यात येणार असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले आहे़ परंतू आठवडे बाजार होणार किंवा कसे याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे़ नागरिकांनी बाजारांमध्ये लहान बालकांना आणू नये असे यापूर्वीच प्रशासनाने कळवले आहे़