काळजी करू नका, काळजी घ्या स्वत:ची -कोरोनाशी लढताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST2021-04-11T04:29:56+5:302021-04-11T04:29:56+5:30

मास्क आणि सॅनिटायझर तर आवश्यक आहेच. सोडियम हायपोक्लाराइड या सोल्युशनने घरातील टेबल, दारे, हॅण्डल आदी पुसून काढा. बोलताना सहा ...

Don't worry, be careful when fighting self-corona | काळजी करू नका, काळजी घ्या स्वत:ची -कोरोनाशी लढताना

काळजी करू नका, काळजी घ्या स्वत:ची -कोरोनाशी लढताना

मास्क आणि सॅनिटायझर तर आवश्यक आहेच. सोडियम हायपोक्लाराइड या सोल्युशनने घरातील टेबल, दारे, हॅण्डल आदी पुसून काढा. बोलताना सहा फूट अंतर आवश्यक आहे. सामाजिक अंतर गरजेचे आहे. लग्न, वाढदिवस, असे काही कार्यक्रम आपण टाळले पाहिजे. आपण घरातल्या घरात कार्यक्रम घेत असलो तरी यामुळे नातेवाईक येतात. हे सध्या टाळले पाहिजे. रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यानंतर तो घरी आल्यावर १४ दिवस संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. यामुळे पॉझिटिव्ह निघाल्यानंतर या दिवसांत घराबाहेर पडू नये.

लस घेणे खूप आवश्यक आहे. लसीला बरेच लोक घाबरतात. कोरोना व्हॅक्सिनला लोक घाबरत आहेत; पण तसे काहीही नाही. व्हॅक्सिन घेतल्यानंतर समजा पॉझिटिव्ह झाले, तर व्हॅक्सिनमुळे तुम्ही लवकर बरे व्हाल. मधुमेह आहे, बीपी, कर्करोग आहे, अशा लोकांनी तर व्हॅक्सिन आधी घेतली पाहिजे. कोरोनाला घाबरू नका; पण स्वत:ची काळजी घ्या. तेव्हा कोरोना तुमच्यापासून दोन हात दूरच राहील, यात शंका नाही.

Web Title: Don't worry, be careful when fighting self-corona