निवडणुकीच्या कामात टाळाटाळ व निष्काळजीपणा करू नये : तहसीलदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:09+5:302021-01-10T04:24:09+5:30
शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने लावला. त्यापैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होणार ...

निवडणुकीच्या कामात टाळाटाळ व निष्काळजीपणा करू नये : तहसीलदार
शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने लावला. त्यापैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २१ ग्रामपंचायतींसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. यासाठी मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण वर्ग शहादा येथील चावरा इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये घेण्यात आला.
तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज झाली असून, त्यादृष्टीने मतदानासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनानंतर ईव्हीएमद्वारे मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यामध्ये कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट जोडणी, अभिरूप मतदान, प्रत्यक्ष मतदान, मतदान करताना यंत्रात बिघाड झाल्यास उपायोजना, मतदानप्रक्रिया, निवडणूक कामाविषयी कागदपत्रे नोंदवही, प्रमाणपत्रे, संविधानिक, असंविधानिक लिफाफे, विविध अर्ज कसे भरावे, केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे कर्तव्य तसेच जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध साइट्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. शेवटी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारण्याची संधी देऊन त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.