आसाणे येथील शिबिरात ७५ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:22 IST2020-04-06T12:22:35+5:302020-04-06T12:22:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आसाणे येथे आयोजित रक्तदान शिबिरात ७५ जणांनी रक्तदान करून रक्त टंचाईच्या काळात एक आदर्श ...

आसाणे येथील शिबिरात ७५ दात्यांचे रक्तदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आसाणे येथे आयोजित रक्तदान शिबिरात ७५ जणांनी रक्तदान करून रक्त टंचाईच्या काळात एक आदर्श घालून दिला.
आसाणे येथील जय दगडूदेव युवा मित्र मंडळातर्फे आणि कै.दगडू पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तसाठा कमी झाल्याने आसाणे येथील युवा मंडळाने हा उपक्रम आयोजित केला होता. गावातील गुरुदत्त मंदीर चौकात आयोजित उपक्रमात गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते. राजकारण, समाजकारणातील मान्यवरांसह युवक मंडळींनी सक्रीय सहभाग दिला. एकुण ७५ जणांनी रक्तदान केले. यावेळी हेमंत पाटील, जितेंद्र पाटील, भारत पाटील यांनी रक्तदात्यांचे स्वागत केले. यशस्वीतेसाठी जय दगडू देव युवा मित्र मंडळ व गावातील विविध युवा संघटनानी सक्रीय सहभाग घेतला. श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचे सहकार्य लाभले. गावातील तरुण मंडळींनी यापूर्वी देखील विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेवून राष्ट्रीय कार्यात आपले योगदान दिले आहे.