घरांची पडझड आणि उन्मळून पडली झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 12:04 IST2019-06-13T12:04:41+5:302019-06-13T12:04:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यात कोसळलेल्या वादळी पावसामुळे घरांची पडझड होऊन झाडे उन्मळून पडली आहेत़ या नुकसानीचे पंचनामे ...

घरांची पडझड आणि उन्मळून पडली झाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यात कोसळलेल्या वादळी पावसामुळे घरांची पडझड होऊन झाडे उन्मळून पडली आहेत़ या नुकसानीचे पंचनामे बुधवारी करण्यात आले होत़े तालुक्यात 70 जणांच्या घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली़
उमर्दे बुद्रुक, फुलसरे, करणखेडा, पिंपळोद, भवानीपाडा, देवपूर, नटावद, समशेरपूर, धमडाई, कोरीट, गुजर जांबोली, राजापूर, भोणे, वैंदाणे, वासदरे, उमर्दे, वडबारे, टोकरतलाव, बिलाडी, काळंबा, धिरजगाव, धानोराख मालपूर, आर्डीतारा आणि पावला या गावांमध्ये 70 घरांची पडझड झाली होती़ वादळात घराचे पत्रे उडून भिंती पडल्या होत्या़ दोन ठिकाणी शाळांचे नुकसान झाल्याची माहिती आह़े तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांनी केलेल्या सूचनेनंतर तलाठींनी सर्व गावांना भेटी देत पंचनामे करुन नुकसानीचा अंदाज घेतला़ घरासह विविध वस्तूंच्या नुकसानीच्या रकमेचा आढावा घेण्यात आला़
उमर्दे आणि वडबारे येथील जिल्हा परिषद शाळांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाल़े याठिकाणी अनुक्रमे 5 हजार आणि 13 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आह़े नटावद येथील नटेश्वर विद्यालयाचे पत्रे उडून 1 लाख 18 हजा रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आल़े तालुक्यातील इतर शाळांचे नुकसान झाल्याची माहिती आह़े वैंदाणे परिसरात वादळी वा:यामुळे नुकसान झाल्याची माहिती आह़े ब:याच ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला़ शेतशिवारातील साहित्य उडून गेल्याने शेतक:यांचे नुकसान झाले आह़े याभागात वादळाचा जोर अधिक होता तर तुरळक पावसाच्या सरी कोसळल्याची माहिती आह़े
तळोदा तालुक्यात 19 घरांची पडझड
तळोदा : तालुक्यातील मोदलपाडा आणि सतोना या दोन गावात 19 घरांचे वादळी पावसात नुकसान झाल़े घरांच्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे केल़े मंगळवारी झालेल्या या पावसामुळे तळोदा शहरातील वीज वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता़ शहादा रस्त्यावर अनेक वृक्ष उन्मळून पडले होत़े
मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक वादळी पाऊस सुरु झाला़ यात पावसापेक्षा वादळाची तीव्रता अधिक होती़ संपूर्ण तालुक्यात केवळ तुरळक पावसाच्या सरी आल्या होत्या़ मात्र वादळाच्या जोरामुळे शहादा आणि अक्कलकुवा रस्त्याच्या दुतर्फा असलेली असंख्य झाडे कोसळली़ रस्त्यालगत उन्मळून पडलेल्या या झाडांमुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती़ दरम्यान तळोदा शहरात शहादा रस्त्यावर वीज तारा तुटून पडल्या होत्या़ यावेळी वीज कंपनीने वीज पुरवठा खंडीत केल्याने मोठी हानी टळली़ वादळी पावसामुळे तालुक्यातील मोदलपाडा आणि सतोना येथील 19 घरांचे पत्रे उडून भिंतींची पडझड झाली़ यात कोणालाही इजा पोहोचली नसल्याची माहिती आह़ेवादळी पावसामुळे मोदलपाडय़ाचे पोलीस पाटील विलास सालमसिंग पाडवी यांच्या घराचे पत्रे उडाले होत़े एका पत्र्याचा तुकडा त्यांच्या खांद्यावर पडल्यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली़
धडगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान
धडगाव : सातपुडय़ाच्या दुर्गम भागात कोसळलेल्या मुसळधार पावसासह वादळामुळे तालुक्यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आह़े बुधवारी दुपारी महसूल विभागाचे पथक तालुक्यात गेले असून त्यांच्याकडून नुकसानीचा आढावा घेणे सुरु आह़े
मंगळवारी सायंकाळी तालुक्यात दीड तास मुसळधार पावसाने हजेरी दिली होती़ पावसावेळी वादळी वारे सुरु असल्याने घरांची पडझड झाली होती़ वादळामुळे सायंकाळपासून तालुक्यात वीज पुरवठा आणि दूरसंचार विभागाची सेवा बंद पडल्याने नुकसानग्रस्तांकडून तालुका मुख्यालयी संपर्क करण्यात अडचणी येत होत्या़ बुधवारी सकाळी धनाजे बुद्रुक, कुसुमवेरी, राडीकलम येथील नुकसानग्रस्तांनी धडगाव येथे येऊन माहिती दिली़ तालुक्यात किमान 35 ते 40 घरांची पडझड झाल्याची माहिती देण्यात आली आह़े