डोकारे ते बिलदा रस्त्याची दुरवस्था ; दुरूस्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:35+5:302021-06-17T04:21:35+5:30
डोकारे ते बिलदा पर्यंतचा डांबरीकरण रस्ता प्रचंड खराब झाला असून, या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोटारसायकल ...

डोकारे ते बिलदा रस्त्याची दुरवस्था ; दुरूस्ती करण्याची मागणी
डोकारे ते बिलदा पर्यंतचा डांबरीकरण रस्ता प्रचंड खराब झाला असून, या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोटारसायकल चालवणे मोठे जिकिरीचे जात आहे. त्यामुळे साईडपट्टीने मार्गस्थ होण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. डोकारे गावाजवळील रस्त्यावर मोठे खड्डे असूृन, चिखली फाट्याजवळील रस्त्यावर चालणे मुश्किलीचे जात आहे. अंजने गावाजवळील देखील रस्ता खराब झाला आहे.
अंजनेपासून ते बिलदा पर्यंतच्या रस्त्यावर देखील खड्डे पडले आहे. हा मार्ग ठिकठिकाणी खचून गेला आहे. पावसाळ्याच्या दिवसात याठिकाणी पाण्याची डबके तयार होतात. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेकवेळा छोटेमोठे अपघात होतात. संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी धायटा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. परिसरातील ग्रामस्थ आठवडे बाजार करण्यासाठी शुक्रवारी चिंचपाडा, शनिवारी नवापूर, रविवारी खांडबारा येथे जात असतात. रस्ता खराब असल्याने मोठे हाल होत आहे. तत्काळ रस्त्याचे डांबरीकरण करून मिळावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धायटा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
उमराण गटात विविध विकास कामे केली जात आहे. या रस्त्यांची निविदा बाकी असून, सावरट गावापासून ते बिलदा पर्यंतचा रा.मा.नऊचा रस्ता काम कार्यारंभ मिळाल्यानंतर सुरू करण्यात येईल. पहिला टप्पा सावरट ते बिलदा व दुसरा टप्पा बिलदा ते खांडबारा व तिसरा टप्पा खांडबारा ते खैरवा पर्यंत रस्ता मंजूर आहे. लवकरच रस्ताची दुरूस्ती केली जाईल. - अजित नाईक, जिल्हा परिषद सदस्य, उमराण गट