कोणी लस घेतं का लस..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST2021-05-05T04:49:45+5:302021-05-05T04:49:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील विविध भागात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा असताना जिल्ह्यात मात्र एक लाखांपेक्षा अधिक लसींचे ...

Does anyone get vaccinated ..! | कोणी लस घेतं का लस..!

कोणी लस घेतं का लस..!

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : राज्यातील विविध भागात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा असताना जिल्ह्यात मात्र एक लाखांपेक्षा अधिक लसींचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. एकीकडे लसीकरणासाठी ४५ केंद्र नियुक्त असताना या केंद्रांवर नागरिकांनी यावे यासाठी आरोग्य विभाग इतर विभागांच्या मदतीने लसीकरण मोहीम राबवत नागरिकांना लस घेण्यासाठी आर्जव करत आहे.

जानेवारी मध्यापासून सुरू झालेल्या लसीकरणात नंदुरबार जिल्ह्याने नेहमीच आघाडी कायम ठेवली आहे. यातून आरोग्य कर्मचारी व हेल्थ केअर वर्कर यांना आतापर्यंत २८ हजार ९१७ लसींचा प्रथम डोस, तर १४ हजार २१२ लसींचा दुसरा डोस पूर्ण करण्यात आला आहे. एकूण ६२ टक्के आरोग्य व फ्रंट लाइन वर्कर यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. हे सुरू असताना ४५ वर्षांवरील ७४ हजार ८७० जणांना प्रथम, तर ३४ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणाची गती ही कायम असताना आरोग्य विभागाकडून नुकतेच २५ हजार डोसेस प्राप्त झाले होते. यातून १८ वर्षांवरील युवकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यातून आतापर्यंत दोन हजार ३७८ जणांना लस देण्यात आली असल्याची माहिती आहे. लस घेण्यासाठी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर गर्दी नसली तरी शिक्षण विभागाने आदेशित केलेल्या शिक्षकांकडून होत असलेल्या जनजागृतीमुळे ग्रामीण भागातील नागरिक केंद्रांवर येत आहेत. तरीही काही ठिकाणी अपेक्षित टारगेट पूर्ण होत नसल्याने नागरिकांची मनधरणी करावी लागत आहे.

आरोग्य विभागाकडून योग्य पद्धतीने लसीकरण सुरू आहे. लसीकरण वाढावे यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी, आशा गावोगावी लसीचे महत्त्व पटवून देत आहेत. यातून जिल्ह्याचे लसीकरणाचे उद्दिष्ट्य पूर्ण होणार आहे.

-डाॅ. एन.डी. बोडके,

जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार

Web Title: Does anyone get vaccinated ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.