गळफास घेत नंदुरबारात डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:23 IST2018-11-05T13:22:48+5:302018-11-05T13:23:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : : मानव अधिकार फोरमचे अध्यक्ष व पशुचिकित्सक डॉ.दिनेश ढोमण पाटील यांनी चित्ते नगरातील आपल्या ...

The doctor's suicide in Nandurbar was carried out | गळफास घेत नंदुरबारात डॉक्टरची आत्महत्या

गळफास घेत नंदुरबारात डॉक्टरची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : : मानव अधिकार फोरमचे अध्यक्ष व पशुचिकित्सक डॉ.दिनेश ढोमण पाटील यांनी चित्ते नगरातील आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून लोकांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. याबाबत उपनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे वैजाली, ता.शहादा येथील राहणारे व सध्या नंदुरबारातील चित्तेनगरात वास्तव्यास असलेले डॉ.दिनेश ढोमण पाटील (46) यांच्याकडे मानव अधिकार फोरमचे राष्ट्रीय अध्यक्षपद आहे. त्यांनी लगतच असलेल्या एका फ्लॅटमध्ये त्यांचे कार्यालय देखील सुरू केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते हे काम पाहत होते. 
चित्ते नगरातील घरी त्यांनी गळफास घेतल्याचे 3 नोव्हेंबर रोजी रात्री उघडकीस आले. एक, दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. कारण मृतदेहाजवळ    दरुगधी येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी घराची झडती घेतली असता घरात आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीलेले आढळून आली. त्यात काही लोकांच्या त्रासाला कंटाळून आपण हा निर्णय घेतल्याचे म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ.दिनेश पाटील यांच्या आई सिंधूबाई ढोमण पाटील यांनी खबर दिल्याने उपनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूपुर्व चिठ्ठीतील मजकुरावरून काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Web Title: The doctor's suicide in Nandurbar was carried out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.