अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी गर्भपात करणारा डॉक्टर फरारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:37+5:302021-06-17T04:21:37+5:30
तसेच मध्यप्रदेशातील मलफा या गावी नेले व दुसऱ्यादिवशी १० जूनरोजी एका शेतातील घरात सकाळी पीडितेचा गर्भपात केला. ...

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी गर्भपात करणारा डॉक्टर फरारच
तसेच मध्यप्रदेशातील मलफा या गावी नेले व दुसऱ्यादिवशी १० जूनरोजी एका शेतातील घरात सकाळी पीडितेचा गर्भपात केला.
पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर शहादा पोलीस ठाण्यात सातजणांविरोधात पोस्को कायदा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पंकज मंगा पाटील, शांताराम भीमा पाटील, प्रेमराज ऊर्फ भुऱ्या शांताराम पाटील, अंबालाल सुभाष पाटील (सर्व रा. ब्राम्हणपुरी, ता. शहादा), एक पुरुष डॉक्टर, मुमताज ऊर्फ मुन्नी हसन पठाण सफाई कामगार, (रा. तकीया बाजार, शहादा), संजय मंगेश पाटील, सिटीस्कॅन सेंटर, खासगी नोकरी, शहादा अशा सातजणांविरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा पोलिसांनी अंबालाल सुभाष पाटील, नर्स मुमताज ऊर्फ मुन्नी हसन पठाण, तसेच सिटीस्कॅन सेंटरचालक संजय मंगेश पाटील या तिघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना १७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य संशयित पंकज मंगा पाटील, शांताराम भीमा पाटील, प्रेमराज शांताराम पाटील या तिघांना यापूर्वीच अटक केली होती. तिघांना न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एकूण सातपैकी सहा संशयितांना पोलिसांनी अद्यापपर्यंत अटक केलेली आहे.
पीडित युवतीचा मध्यप्रदेशातील मलफा येथील शेतात बेकायदेशीररित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असला, तरी अद्यापपर्यंत सदर डॉक्टर फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तो डॉक्टर कोण? याबाबत संपूर्ण तालुक्यात तर्कवितर्क लावले जात आहेत. या गुन्ह्यात डॉक्टरची भूमिका महत्त्वाची असल्याने या डॉक्टरने यापूर्वीही असे अनेक बेकायदेशीर गर्भपात केले असावेत, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी फरार असलेल्या या डॉक्टरला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.