लॉकडाऊनमध्ये जुगार मांडणाऱ्यांवर पडली धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 12:05 IST2020-04-06T12:04:56+5:302020-04-06T12:05:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी देशात लॉकडाऊन असताना पत्त्यांचा जुगार मांडून साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी काढलेल्या आदेशांचा खेळ ...

लॉकडाऊनमध्ये जुगार मांडणाऱ्यांवर पडली धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाला थोपवण्यासाठी देशात लॉकडाऊन असताना पत्त्यांचा जुगार मांडून साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी काढलेल्या आदेशांचा खेळ करणाºया तळोदा पालिकेच्या नगरसेवकासह सहा जणांना एलसीबीच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले़ जुगार अड्ड्यावर पडलेल्या धाडीमुळे तळोद्यात एकच खळबळ उडाली असून जुगार अड्ड्यातून पथकाने साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना तळोदा शहरातील शहादा रोडवर हॉटेल सद्भावना समोर असलेल्या दुकानात नावाने काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार शनिवारी पथकाने या भागात चौकशी केल्यावर जुगार सुुरु असल्याचे स्पष्ट झाले होते़ यानंतर शनिवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक नवले यांनी पथकासह शहादा रस्त्यालगत असलेल्या दुकानात धाड टाकली होती़ यावेळी पथकाला योगेश शांताराम मराठे, रा. मराठा चौक, तळोदा, भरत मक्कन चौधरी रा. गणपती गल्ली तळोदा, नगरसेवक हितेंद्र सरवनसिंग खाटीक रा. पोस्ट आॅफीस समोर, तळोदा, महेश सुवालाल अग्रवाल रा.आदीवासी मोहल्ला, वाकाचार रस्ता ता. निजर जि तापी (गुजरात), किशोर एकनाथ भाट रा. सुभाष टॉकीज जवळ तळोदा, सुभाष बाबु गोसावी रा. वेळावद ता. शहादा हे सहा जण पत्ते खेळत असताना मिळून आले़ सर्व सहा संशयित बसून तीन पत्तीचा जुगार खेळत होती़ धाड पडल्यानंतर तेथून निसटण्याचा त्यांचा प्रयत्नही अयशस्वी झाला़ सर्व संशयितांची झडती घेत त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला़ तळोदा शहरातील मन बहुउद्देशीय संस्थेच्या नावाने हा सोशल क्लब सुरु होता़
याबाबत पोलीस शिपाई राजेंद्र चिंतामण कारले यांनी फिर्याद दिली असून जुगार खेळणाºया सहा जणांसोबतच मन सोशल क्लबच्या ११ पदाधिकाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ बहुउद्देशीय संस्थेच्या आड सोशल क्लबला परवानगी देत जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या मनाई आदेशांचे तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग कायदा कलमांचे उल्लंघन केल्याने पदाधिकाºयांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे़
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक बाळकृष्ण गोरे, पोलीस नाईक दादाभाई मासूळ, प्रमोद सोनवणे, मनोज नाईक, विजय ढिवरे, पोलीस शिपाई शोएब जब्बार शेख, सतीष घुले यांच्या पथकाने ही कारवाई केली़
पोलीस पथकाने केलेल्या चौकशीत मन बहुउद्देशीय संस्थेत नगरसेवक हितेंद्र खाटीक, योगेश मराठे, भरत चौधरी, कमल परदेशी, गायत्री चौधरी, आसिफ शेख इब्राहिम, निलीमा चौधरी, आशा पाटील, वर्षा परदेशी, सर्व रा. तळोदा हे सदस्य आहे तर याच संस्थेकडून नोंदणी असलेल्या सोशल क्लबमध्ये हितेंद्र खाटीक, योगेश शांताराम मराठे, भरत चौधरी, कमल परदेशी, कमलेश पाडवी, विनोद मराठे, संजय गोपीचंद वानखेडे, धर्मराज सागर पवार, गजेंद्र कोचरु पाडवी, सुनील रमेश पाडवी हे सर्व कार्यकारी मंडळात आहेत़
पथकाने येथे धाड टाकल्यानंतर पत्ते खेळणाºयांसह तेथील टेबल आणि इतर साहित्य असा एकूण ५ लाख ४५ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांकडून जप्त करण्यात आला आहे़ पोलीसांनी अचानक टाकलेल्या या धाडीची तळोदा दोन दिवसांपासून चर्चा रंगली आहे़ रविवारी पहाटे सर्व संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़