कृषी विज्ञान केंद्रात जिल्हा हवामान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:40 IST2019-09-06T12:39:50+5:302019-09-06T12:40:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हवामानविषयक त्या त्या तालुक्याची अद्ययावत माहिती शेतक:यांना एसएमएस द्वारे मिळणार आहे. कृषी विज्ञान केंद्रात ...

District Meteorological Center at the Agricultural Science Center | कृषी विज्ञान केंद्रात जिल्हा हवामान केंद्र

कृषी विज्ञान केंद्रात जिल्हा हवामान केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : हवामानविषयक त्या त्या तालुक्याची अद्ययावत माहिती शेतक:यांना एसएमएस द्वारे मिळणार आहे. कृषी विज्ञान केंद्रात जिल्हा कृषी हवामान केंद्राची सोय करण्यात आली असून त्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. 
जागतिक हवामान बदलामुळे तापमान वाढ, अनियमित पाऊस, हवेतील आर्दता आणि तापमानातील अचानक चढउतार अशा घटनांची सुरुवात झाली आहे. भारतीय हमानशास्त्र विभाग व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्यामार्फत शेतक:यांना हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्याचा प्रय} आहे. त्यासाठी देशभरातील विविध कृषी विज्ञान केंद्रात जिल्हा कृषी हवामान केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. यालाच डामू अर्थात डिस्ट्रीक्ट अॅग्रो मेट्रॉलॉजीकल युनिट या नावाने संबोधले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज लक्षात घेवून पिकांचे नुकसान टाळणे शक्य होणार आहे. यापूर्वी ढोबळ मनाने मिळणारी माहिती आता थेट तालुकानिहाय देण्यात येणार असल्याने शेतक:यांना त्याचा फायदा होणार आहे. 
या केंद्राचे तांत्रिक मार्गदर्शन डॉ. कृषी विज्ञान केंद्रात मिळणार आहे. जिल्ह्यातील भौगोलिक विविधता लक्षात घेवून तालुकानिहाय हवामानाचा अंदाज, किड व रोगांचा प्रादुर्भाव याची माहिती तसेच त्यावर करावायाच्या उपाययोजना या बाबींची माहिती देणारा एसएमएस शेतक:यांना मिळणार आहे. त्यासाठी शेतक:यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदणी करणे आवश्यक आहे. दर मंगळवारी आणि शुक्रवारी माहिती दिली जाणार आहे. यामुळे शेतक:यांना तात्काळ उपाययोजना करण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ सचिन फड यांनी दिली. 
 

Web Title: District Meteorological Center at the Agricultural Science Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.