स्वच्छताविषयक जिल्हास्तरीय कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:20 IST2019-09-05T12:20:44+5:302019-09-05T12:20:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा स्वच्छ आणि हागणदारीमुक्त ठेवण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी नागरिकांच्या मनावर बिंबविणे आवश्यक आहे. अधिकारी-कर्मचा:यांनी त्यासाठी ...

District level workshop on sanitation | स्वच्छताविषयक जिल्हास्तरीय कार्यशाळा

स्वच्छताविषयक जिल्हास्तरीय कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा स्वच्छ आणि हागणदारीमुक्त ठेवण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी नागरिकांच्या मनावर बिंबविणे आवश्यक आहे. अधिकारी-कर्मचा:यांनी त्यासाठी अधिक प्रय} करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले. 
छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहात ‘शाश्वत स्वच्छता व शोषखड्डा घेण्याचा अभिनव संकल्प’ विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, प्रा. यजुर्वेद महाजन, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते. जिल्हा स्वच्छ करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. प्रशासकीय यंत्रणेमार्फत त्यादृष्टीने प्रय} होत आहेत. चांगल्या कामाची उजळणी करण्यासाठी आणि जिल्ह्याला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी नवा संकल्प घेण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ.भारूड यांनी सांगितले. 
यजुव्रेद महाजन म्हणाले, चांगल्या कार्यासाठी दृष्टीकोणात मुलभूत बदल होणे आवश्यक आहे. केवळ कर्तव्याचा भाग म्हणून स्वच्छता अभियानाकडे न पाहता समाधान आणि आनंदासाठी कार्य करावे. योग्य कार्यसंस्कृती दैनंदीन कामकाजात प्रतिबिंबीत झाल्यास प्रत्येक अभियान यशस्वी करणे सहज शक्य आहे. कामाचा आनंद मिळविण्यासाठी अधिका:यांनी प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. अनिल सोनवणे म्हणाले, जिल्हा मार्च 2018 मध्ये हागणदारीमुक्त झाला असून सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अजूनही चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. 
2 ऑक्टोबर पयर्ंत जिल्ह्यात स्वच्छता करणे आणि उघड्यावर सांडपाणी दिसणार नाही यादृष्टीने प्रय} करण्यात येणार आहेत. शोषखड्यामुळे अनेक रोगांवर नियंत्रण करणे शक्य असल्याने मनरेगाच्या माध्यमातून शोषखड्डे घेण्यात यावेत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला महसूल, कृषी, जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.    
 

Web Title: District level workshop on sanitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.