जिल्हास्तरीय गो-गर्ल्स-गो स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:54 IST2020-03-02T11:54:07+5:302020-03-02T11:54:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय गो-गर्ल-गो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ ...

जिल्हास्तरीय गो-गर्ल्स-गो स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय गो-गर्ल-गो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या़
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले़ यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होत्या़ गो-गर्ल-गो मोहिमेंतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धेत ६ ते ९ वर्ष, १० ते १३, १४ ते १८ या तीन वयोगटातील विद्यार्थिनींची धावण्याची स्पर्धा घेण्यात आली़ यात ६ ते ९ वयोगटात तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळेची खेळाडू रविता रमेश पावरा प्रथम तर याच शाळेची रुनी ढोनसिंग नाईक हिने द्वितीय क्रमांक पटकावला़ तिसफोडीपाडा ता़ धडगाव येथील जिल्हा परिषद शाळेची रोशनी भरत पावरा हिने तृतीय क्रमांक तर १० ते १३ वयोगटात चुलवड शासकीय आश्रमशाळेची रोशनी बायसा पावरा प्रथम, सरी ता़ अक्कलकुवा आश्रमशाळेची मालती दोहऱ्या वसावे द्वितीय तर तलावडी ता़ तळोदा आश्रमशाळेची कलावती गेंद्या पाडवी हिने तृतीय क्रमांक पटकावला़ १४ ते १८ वयोगटात तलावडी ता़ तळोदा येथील मिना ठोबड्या वसावे प्रथम, शेवंती धनसिंग ठाकरे द्वितीय तसेच आंतरराष्ट्रीय शाळा तोरणमाळ येथील वरसा रमा पावरा हिने तृतीय क्रमांक पटकावला़ विद्यार्थिनींना माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, उपशिक्षणाधिकारी डॉ़ युनूस पठाण, सहायक कार्यक्रम अधिकारी मनिषा पवार, सुनंदा पाटील यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले़ विजयी खेळाडू ८ मार्च रोजी बालेवाडी पुणे येथे होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे नेतृत्त्व करतील़