जिल्हा रुग्णालय हस्तांतरणाच्या फाईलवर सह्या होऊनही थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:36 IST2019-09-18T12:36:02+5:302019-09-18T12:36:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वैद्यकीय शिक्षण विभागाने नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरण प्रक्रियेबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असतानाही ...

जिल्हा रुग्णालय हस्तांतरणाच्या फाईलवर सह्या होऊनही थंडबस्त्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वैद्यकीय शिक्षण विभागाने नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरण प्रक्रियेबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असतानाही प्रत्यक्ष हस्तांतरण रखडले आह़े गेल्या चार महिनाभरापासून वेगात असलेल्या या प्रक्रियेला अचानक ब्रेक लागून हस्तांतरणाची फाईलही थंडबस्त्यात आह़े
जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक प्रगल्भ व्हाव्यात यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे घोषित केले होत़े महाविद्यालय मंजूर करुन जागाही आरक्षित करण्यात आली होती़ 2018 पासून सुरु होणारे महाविद्यालय जागेअभावी 2019 मध्ये सुरु होणार असल्याचे खात्रीलायक सांगण्यात येत होत़े गत चार महिन्यापासून तीन वर्षाच्या करारावर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा रुग्णालय हस्तांतरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होत़े यासाठी मंत्रालयीन स्तरावर कारवाई पूर्ण झाली होती़ दरम्यान गेल्या महिन्यात वैद्यकीय महाविद्यालयात नियुक्त केले गेलेले अधिष्ठाता डॉ़ गिरीश ठाकूर यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली होती़ यानंतर करारावर स्वाक्ष:या झाल्याची माहिती आह़े परंतू गेल्या महिनाभरात मात्र कोणत्याही प्रकारे कामकाज झालेले नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतिक्षा कायम आह़े
दरम्यान जिल्हा रुग्णालयात नियुक्त असलेल्या कंत्राटी कर्मचारी काढून टाकणार असल्याने कर्मचारी हवालदिल झाले होत़े परंतू येथे नियुक्त असलेले 100 च्या जवळपास कर्मचारी हे इतरत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े अद्याप तशी कोणतीही कारवाई करण्याचे संकेत दिले गेलेले नसले तरी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी या कंत्राटी कर्मचा:यांची नियुक्ती होण्याची शक्यता आह़े येत्या काळात याबाबत चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े