जिल्हा रुग्णालयाला सीएसआर फंडातून ५० फाऊलर बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST2021-06-23T04:20:47+5:302021-06-23T04:20:47+5:30

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. के. डी. सातपुते, सीवायडीएचे सचिव मॅथ्यू मट्टम, समन्वयक अमोल ...

District Hospital receives 50 fowler beds from CSR fund | जिल्हा रुग्णालयाला सीएसआर फंडातून ५० फाऊलर बेड

जिल्हा रुग्णालयाला सीएसआर फंडातून ५० फाऊलर बेड

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. के. डी. सातपुते, सीवायडीएचे सचिव मॅथ्यू मट्टम, समन्वयक अमोल शेवाळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी सीवायडीएला धन्यवाद देताना ग्रामीण भागात लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी संस्थेकडून चांगले सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. फाऊलर बेडचा उपयोग रुग्णांवर उपचार करण्यासाठी चांगल्यारितीने होईल, असे ते म्हणाले.

गावडे यांनी सीवायडीएतर्फे जिल्ह्यात स्वच्छता आणि आरोग्यासंदर्भात चांगले काम होत असल्याचे सांगितले. कुपोषण कमी करण्याच्या प्रयत्नात संस्थेने देऊ केलेले सहकार्य स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

मॅथ्यू यांनी नंदुरबार जिल्ह्यात संस्थेतर्फे सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. सॅम आणि मॅम बालक असलेल्या दोन हजार कुटुंबांना पोषण आहाराचे कीट वितरीत करण्यासोबत ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाबाबत जनजागृतीचे नियोजन संस्थेतर्फे करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: District Hospital receives 50 fowler beds from CSR fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.