राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST2021-02-09T04:34:36+5:302021-02-09T04:34:36+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रसंगी राष्ट्रवादी युवक ...

District Executive of NCP Youth Congress formed | राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी गठित

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी गठित

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार झालेल्या बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा निरीक्षक सत्यजीत सिसोदे, जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा, माजी आमदार शरद गावीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्षपदी रवींद्र भाईदास कुवर, जिल्हा उपाध्यक्ष ईलेश दिवाल्या गावीत, जिल्हा सरचिटणीस मेहुलकुमार सत्यपाल वळवी, लक्ष्मीकांत प्रमोद ईशी, जिल्हा सचिव शिवाजी भुखल्या ठाकरे, जिल्हा संघटकपदी गणेश रतिलाल पाटील, जिल्हा सहसंघटकपदी विक्की मनुभाऊ बिऱ्हाडे, नटवर मानसिंग पावरा, आकाश रायसिंग पाडवी, नवापूर तालुकाध्यक्षपदी धिरसिंग जतनसिंग वसावे, नवापूर शहराध्यक्षपदी आकाश राजेेश गावीत, शहादा तालुकाध्यक्षपदी महेंद्र अरविंद कुवर, शहादा शहराध्यक्षपदी शेख ईकबाल शेख सलीम यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रसंगी सत्यजीत सिसोदे यांनी जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची फळी तयार करून मजबूत संघटन ठेवावे, असे आवाहन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांनी नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाईल. यासाठी प्रत्येक गाव-पाड्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करावे, अशी माहिती दिली.

Web Title: District Executive of NCP Youth Congress formed