ग्रॅपलिंग (कुस्ती) कमिटीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:21 IST2021-06-25T04:21:56+5:302021-06-25T04:21:56+5:30
ग्रॅपलिंग (कुस्ती) कमिटी ऑफ नंदुरबारची सभा शहादा येथे झाली. या सभेत महाराष्ट्र राज्य ग्रॅपलिंग कमिटीचे सचिव प्रशांत नवगिरे यांच्या ...

ग्रॅपलिंग (कुस्ती) कमिटीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर
ग्रॅपलिंग (कुस्ती) कमिटी ऑफ नंदुरबारची सभा शहादा येथे झाली. या सभेत महाराष्ट्र राज्य ग्रॅपलिंग कमिटीचे सचिव प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रॅपलिंग कमिटी ऑफ नंदुरबारची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कमिटीच्या अध्यक्षपदी संदीपसिंग राजपाल यांची, तर सचिवपदी लोणखेडा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. अरविंद कांबळे यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी अशी : कार्याध्यक्ष प्रा. भारत चाळसे, उपाध्यक्ष महेंद्र काटे, शिवपाल जांगीड, शेख वसीम, कोषाध्यक्ष उमेश पेंढारकर, सहकोषाध्यक्ष फरहान बागवान, सहसचिव प्रा. युवराज राठोड, सदस्य रमेश जयस्वाल, स्वप्निल रणदिवे, महिला प्रतिनिधी आरती अहिरे, तालुका अध्यक्ष पुढीलप्रमाणे शहादा- हर्षल चौधरी, अक्कलकुवा- आनंद बिरारे, तळोदा- राकेश अमृतसागर, धडगाव- सुनील गुरखा, नंदुरबार- भागूराव जाधव, नवापूर- नरेश जयस्वाल.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण हे ग्रॅपलिंग कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ग्रॅपलिंग हा खेळ शालेय क्रीडा स्पर्धेत समाविष्ट खेळ असल्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील पहेलवानांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी प्रत्येक गावात व्यायामासाठी आखाडा असायचा. आता ते बंद पडलेले आहेत, त्यांना पुन्हा स्थापित करणे ही काळजी गरज आहे, असे मत प्रा.अरविंद कांबळे यांनी व्यक्त केले. नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष संदीपसिंग राजपाल यांनी गाव तेथे आखाडा स्थापन करणे, पहेलवान घडविण्यासाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून त्यांच्यासाठी राष्ट्रीय दर्जाचे कोच बोलवून प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, खेळाचा प्रसार व प्रचार करून खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी शहादा शहर व नंदुरबार जिल्ह्यात जे आखाडे बंद पडलेले आहेत त्यांना पुन्हा सुरू करण्यासाठी संघटना नेहमी प्रयत्नशील राहील, असे सांगितले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. भारत चाळसे यांनी केले. आभार शेख वसीम यांनी मानले.