गृह अलगीकरणाची सुविधा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:20+5:302021-01-19T04:33:20+5:30
गृह अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झालेल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसात कोविड बाधितांची संख्या वाढत ...

गृह अलगीकरणाची सुविधा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
गृह अलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनास प्राप्त झालेल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसात कोविड बाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर आदेश देण्यात आले आहेत. संपर्कातील सर्व व्यक्तींची नोंद घेण्याचे निर्देश कोविड बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची नोंद घेण्याचे निर्देशही डॉ. भारुड यांनी दिले आहेत. कोविड बाधित आढळून आलेल्या गावात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्तिश: भेट द्यावी. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची स्वॅब चाचणी करावी आणि कोविड बाधित आढळून आल्यास तात्काळ कोविड रुग्णालयात दाखल करावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
लग्न समारंभात सूचनांचे पालन न झाल्यास कारवाई
लग्न समारंभ, अंत्यविधी तसेच गर्दी होणाऱ्या इतर विधी व सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवावे असे निर्देश जिल्हादंडाधिकारी डॉ. भारुड यांनी दिले आहेत. नागरिकांकडून मास्क घालणे आणि शारीरिक अंतराबाबत नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्यात यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.