नवापूर सीमा तपासणी नाक्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:46 PM2020-05-21T12:46:47+5:302020-05-21T12:46:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राज्याच्या सीमेवरून आतापावेतो सुमारे २५ हजार स्थलांतरीतांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी सोय करून देण्यात आल्याचे ...

District Collector inspects Navapur border check post | नवापूर सीमा तपासणी नाक्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नवापूर सीमा तपासणी नाक्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : राज्याच्या सीमेवरून आतापावेतो सुमारे २५ हजार स्थलांतरीतांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी सोय करून देण्यात आल्याचे समाधान जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी व्यक्त केले. सीमा तपासणी नाक्यावर दिलेल्या भेटीनंतर ते बोलत होते.
नवापूर तालुक्यात सुरू असलेल्या मजगी, मनरेगा व इतर कामांची पाहणी, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विविध ठिकाणांची पाहणी करून येथील तहसील कार्यालयात विविध विभागांच्या आढावा बैठका जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड बुधवारी घेतल्या. उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांच्यासह पंचायत समिती सभापती रतीलाल कोकणी, प्रभारी तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हरिश्चंद्र कोकणी, तालुका कृषी अधिकारी व्ही.डी. चौधरी याप्रसंगी उपस्थित राहीलेत.
विसरवाडी जवळ मोठे कडवान येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरूअसलेल्या गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहाणी त्यांनी केली. मजुरांशी संवाद साधतांना प्रति दिन किती मजुरी मिळते, किती दिवसांपासून काम सुरू आहे. पहिल्या मस्टर वरील मजुरीचे पैसे मिळाले का? याबाबत त्यांनी विचारणा केली. तेथे उपस्थित सहाय्यक अभियंता ठाकरे यांना किती काम झाले व पाण्याचा किती साठा होईल याची माहिती जाणून घेतली.
तालुका कृषी विभागांतर्गत फळबाग लागवड, मजगी, शेतबांध बंदीस्ती इत्यादी कामाच्या सेल्फ तयार करून तत्काळ कामे सुरू करावीत अन्यथा प्रशासकीय कार्यवाहीस सामोरे जाण्याची वेळ येईल, असा इशारा जिल्हाधिकारी भारूड यांनी दिला. वहार्डीपाडा येथील जुन्या सिंमेट बंधाºयातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शैलेश गावीत, वहार्डीपाडा सरपंच लिलाबाई वसावे, माजी पंचायत समिती सदस्य राम कोकणी, विस्तार अधिकारी दिलीप कुवर आदी उपस्थित होते.
नवापूर तालुक्यात महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे सर्व कामे अंत्यत चांगल्या पध्दतीने सुरू असल्याबद्दल गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांचे त्यांनी कौतुक केले. नवापूर सिमा तपासणी नाक्यावर लॉकडाऊन मधील शिथिलता पाहता गुजरात राज्यातुन महाराष्ट्र सिमेवर असंख्य मजूर व कामगार येत आहेत. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून त्यांना एसटी बसने इच्छीत ठिकाणी पोहचविण्यात येत असल्याने तेथे भेट देवून त्यांनी पाहणी केली. आपल्या राज्य सीमेवर एक ही नागरीक शिल्लक रहायला नको किंवा पायी जायला नको याची दक्षता घ्यावी. आवश्यक झाल्यास वाढीव बसेस मागवा अशी सूचना त्यांनी आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांना केली.

४सीमा परिवहन तपासणी नाक्यावर सार्वजनिक स्वच्छता गृह बंद ठेवण्यात आल्याची बाब समोर आल्यावर संबंधीतांशी याबाबत बोलणी करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी स्पष्ट केले.
४कोरोनाशी चार हात करून त्याचा नवापूर तालुक्यात शिरकाव न होऊ देण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारे सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी तोंड भरून कौतुक केले व समाधानही व्यक्त केले.

Web Title: District Collector inspects Navapur border check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.