शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जिल्हा प्रशासनाची खाजगी डॉक्टरांसोबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:20 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि आयएमएच्या प्रतिनिधी खाजगी डॉक्टर यांच्यात बैठक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि आयएमएच्या प्रतिनिधी खाजगी डॉक्टर यांच्यात बैठक घेण्यात आली़ यावेळी तापाचे रुग्ण आढळल्यास खाजगी डॉक्टरांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिल्या़ आयएमनेही बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्दे मांडून कारवाई करण्याची मागणी केली़बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एऩडी़ बोडके, डॉ.राजेश वसावे,आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश वळवी, डॉ.राजकुमार पाटील, डॉ.राजेश कोळी, डॉ.अनिकेत नागोटे, डॉ.गिरीष तांबोळी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी सांगितले की, पावसाळ्यात तापाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या तापाच्या रुग्णांची माहिती तात्काळ तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे द्यावी़ तापाच्या रुग्णात कोरोनाची लक्षणे असण्याची शक्यता लक्षात घेता दक्षता घेणे आवश्यक आहे.विशेषत: तापाचे रुग्ण रेडझोनमधील जिल्ह्यात प्रवास करून आलेले असल्यास अशा प्रत्येक रुग्णाचे स्वॅब घेणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांची माहिती शासकीय यंत्रणेला देण्यात यावी. दोन ते तीन दिवसात लक्षणे कायम असल्यास अशा रुग्णांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येईल.आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ़ राजेश वळवी यांनी शहरातील खाजगी डॉक्टरांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकून कोरोनाविरोधाच्या युद्धात खाजगी डॉॅक्टर प्रशासनाच्या सोबत असल्याचे यावेळी सांगितले़ बैठकीला सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्ह्यातील आयएमएचे सदस्य डॉक्टर उपस्थित होते.आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ़ राजेश वळवी यांच्यासह प्रतिनिधींनी बैठकीत विविध आठ मुद्दे मांडून लक्ष वेधून घेतले़जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने/रुग्णालये नियमित सुरु आहेत़बºयाच हॉस्पिटल्समध्ये स्टाफची कमरता असतानाही कामकाज सुरळीत सुरु आहे़हॉटस्पॉटमधून आलेल्या नागरिकांचे होम क्वारंटाईन कडक पद्धतीने प्रशासनाने करावे, ज्यांना कोविडची लक्षणे आहेत त्यांनी सरळ जिल्हा रुग्णालयात जावे, जेणेकरुन खाजगी रुग्णालयांवर ताण पडणार नाहीत किंवा ते बंद पडणार नाहीत़खाजगी डॉक्टरांना मेडिकल इन्शुरन्स स्कीममधून शासनाने ५० लाख रुपयांचा विमा देण्याची तरतूद करावी़रेड झोनमधून आलेल्या सर्व नागरिकांना होम क्वारंटाईनचा शिक्का सक्तीने मारण्यात यावा़खाजगी दवाखान्यातून पाठवलेल्या गर्भवती मातांची कोविड तपासणी करण्यात यावी़कोरोनाची लक्षणे असलेल्यांच्या स्वॅबचा अहवाल लवकर मिळावा़ शक्य असल्यास खाजगी प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाने मदत करावी़शहरी भागांमध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कचरा संकलित करणाºया घंटागाड्यांच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती व उपाययोजना करणाºया आॅडिओ क्लिप्स प्रसारित करण्यास प्राधान्य देण्यात यावे़बैठकीत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी रक्तदान शिबिर घ्यावे, दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहतील आणि आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा राहील याची दक्षता घ्यावी. मुख्यालयी न राहणाºयांविरोधात कारवाई करावी, प्रत्येक शासकीय रुग्णालयात आॅक्सीमीटर ठेवण्यात यावे, तालुका स्तरावर क्वारंटाईन केंद्राची क्षमता दुप्पट करण्यासाठी आवश्यक जागेची पाहणी करावी, क्वारंटांईन केंद्रातील व्यक्ती घरी परतल्यानंतर सॅनेटायझेशन आणि घराच्या स्वच्छतेवर भर द्यावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी बैठकीत दिले़