व्हीएसजीजीएम मेडिकल किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:01+5:302021-06-01T04:23:01+5:30
व्हीसीजीजीएम या सामाजिक संस्थेमार्फत वाटप करण्यात आलेल्या कोरोना मेडिकल किटमध्ये तीन मास्क, औषधी गोळ्या, आयुर्वेदिक काढा आदींचा समावेश ...

व्हीएसजीजीएम मेडिकल किटचे वाटप
व्हीसीजीजीएम या सामाजिक संस्थेमार्फत वाटप करण्यात आलेल्या कोरोना मेडिकल किटमध्ये तीन मास्क, औषधी गोळ्या, आयुर्वेदिक काढा आदींचा समावेश आहे. या किटचा वाटप प्रारंभ निझर येथून करण्यात आला. अखिल भारतीय गुजर मंडळाचे गुजरात प्रदेश संघटन महामंत्री महेंद्र पटेल, उपाध्यक्ष सुनील पटेल, दीप नर्सरीचे संचालक महेंद्र पटेल, दीपक पटेल, व्हीएसजीजीएम व एबीजीएमचे अध्यक्ष मोहन पटेल, कार्यकारी अध्यक्ष जगदीश पटेल, बारडोलीचे प्रा.सचिन पटेल, नीरव साळुंके, सहसचिव मुरलीधर पाटील, अंकलेश्वर कमिटीचे सदस्य भरत पटेल, ईश्वर पटेल, राधेश्याम पटेल व पुरुषोत्तम पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानंतर नंदुरबार परिसर व तालुक्यातील विविध गावांमध्ये या किटचे वाटप करण्यात आले.
नंदुरबार येथील अथर्व मेडिकल येथे शीतल पटेल, विभाग प्रमुख हितेश पाटील (दहिंदुलेकर) यांच्या उपस्थितीत गावांच्या प्रतिनिधींना किटचे वाटप करण्यात आल्या. प्रकाशा व तळोदा परिसरातील गावांसाठी सद्गुरू धर्मशाळेचे अध्यक्ष मोहन चौधरी व किशोर चौधरी यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले. शहादा येथे डॉ.प्रफुल्ल पाटील, संदीप पाटील, शिरपूर परिसर चंद्रकांत पटेल, शहादा पालिकेचे माजी आरोग्य सभापती राकेश पाटील, केतन गुजर, रूपेश पाटील, धनंजय पाटील, पत्रकार हितेश पटेल, स्वप्निल पाटील, सागर पाटील, म्हसावद विभाग प्रमुख योगेश पाटील, कल्पेश पाटील, योगेश पाटील, कपील पाटील, पत्रकार हरिकृष्ण पाटील, योगेश पाटील (औरंगपूर), अंकुर पाटील, प्रवीणकुमार पाटील, अनिल पाटील, बाबा पाटील यांच्या उपस्थितीत किटचे वाटप करण्यात आली. यात निझर, वेलदा, वाका, चिचोदा, पथराई, आडछी, भवाली, जांबोली, लोय, पिंपळोद, कोठली, करणखेडा, नंदुरबार, करजकुपा, नळवा, दहिंदुले, कोळदा, पातोंडा, शिंदे, समशेरपूर, लहान लोणखेडा, लहान शहादे, पळाशी, गुजरखर्दे, चिनोदा, बहुरूपा, आमलाड, तळवे, मोड, सावळदा, कोरीट, हाटमोहिदे, सुजालपुर, वडछील, खेड, सुलवाडा, होळ, मामाचे मोहीदे, मोठा लोणखेडा, पिंप्री, महसावद, आवगे, जुनवणे, पाडळदा, होळ, चिखली, जयनगर, परिवर्धे, कलसाडी, तऱ्हाडी, खैरवे, कोंढावळ, डामरखेडा, हिंगणी, भरवाडे, फेस, वेळावद, चांदपुरी, वडाळी, शहादा, बामखेडा, काकर्दे, औरंगपूर, कहाटूळ, सारंगखेडा, वरुळ कानडी, धुरखेडा, भादे, काथरदे खुर्द, शिरुड आदी गावांत किटचे वितरण करण्यात आले.