निगदी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:35 IST2021-08-14T04:35:30+5:302021-08-14T04:35:30+5:30

पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ, नंदुरबार संचलित आश्रमशाळा मोलगी येथील शिक्षक लोटन पावरा व गोटू पावरा यांनी आपल्या निगदी ...

Distribution of school materials to students at Nigdi | निगदी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

निगदी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ, नंदुरबार संचलित आश्रमशाळा मोलगी येथील शिक्षक लोटन पावरा व गोटू पावरा यांनी आपल्या निगदी गावातील शालेय विद्यार्थ्यांना आदिवासी दिनाचे औचित्य साधत विविध शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

निगदी गावातील शिक्षक विजय भाईदास पावरा हे कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान होऊ नये म्हणून अनेक महिन्यांपासून निगदी गावातील विद्यार्थ्यांना विनामूल्य अध्यापन करीत होते. त्यांनी स्वतःच्या घरातच गावातील विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग सुरू केले. सुरुवातीला विद्यार्थिसंख्या कमी होती. मात्र पुढे ती वाढत गेली. सद्य:स्थितीत निगदी गावात दिलवरसिंग पावरा यांच्या राहत्या घरात ६०-७० विद्यार्थ्यांना रोज न चुकता ते अध्यापनाचे कार्य करीत आहेत. विजय पावरा यांची गावाप्रती असलेली तळमळ पाहून मोलगी अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक लोटन पावरा व गोटू पावरा यांनी विद्यार्थ्यांना मदत म्हणून स्वखर्चाने शालेय साहित्य वाटप केले. तसेच नंदुरबार जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांचे ‘मी एक स्वप्न पाहिले’ हे पुस्तक भेट देण्यात आले. या वेळी लोटन पावरा, नारायण पावरा, दिलवरसिंग पावरा, रणजित पावरा व विजय पावरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मेरसिंग पावरा, सायसिंग पावरा, चंपा पावरा, बुरद्या पावरा, हिंमत पावरा, मंगेश पावरा, लालसिंग पावरा, जयसिंग पावरा, दशरथ पावरा, रामा झांगडे, सरपंच चौधरी पावरा, पोलीस पाटील वाण्या पावरा, उपसरपंच रणजित पावरा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Web Title: Distribution of school materials to students at Nigdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.