धडगाव नगर पंचायतमार्फत घरकुल योजनेचे आदेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:46 IST2020-02-24T13:46:35+5:302020-02-24T13:46:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी धडगाव नगर पंचायतमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आदेश वाटप ...

धडगाव नगर पंचायतमार्फत घरकुल योजनेचे आदेश वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी धडगाव नगर पंचायतमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आदेश वाटप करण्यात आले.
रोषमाळ व वडफळ्या या दोन ग्रामपंचायती मिळून स्थापन झालेल्या धडगाव नगरपंचायतमार्फत बेघर व गरीबांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले आहे. लाभार्थ्यांकडून घराच्या कामाला सुरुवात व्हावी, यासाठी नगरसेवक मतिन कुरेशी यांच्या हस्ते आदेश वाटप करण्यात आले. आदेश वाटप झालेल्या लाभार्थ्यांमध्ये रोषमाळ बु. येथील परमारवाड्यातील फारुख रहिम बागवान, जानकी पाडवी, राजेंद्र पाडवी, यमुना पाडवी यांचा समावेश आहे. यावेळी नगरसेवक कुरेशी यांच्यासोबत शाबीर खाटीक, अल्ताफ कुरेशी, नाजिम पिंजारी, अकिल बेलदार, भिकन पठाण, कय्युम मण्यार आदी उपस्थित होते.