शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

राज्य युवा संमेलनात प्रेरणा पुरस्कांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 13:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रेरणादायी काम करणा-यांचा सन्मान विवेकानंदाच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी आजच्या युवकांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रेरणादायी काम करणा-यांचा सन्मान विवेकानंदाच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी आजच्या युवकांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे असून अंगी असलेल्या युवाशक्तीद्वारा देशासमोरील आव्हानावर उपाय शोधणे गरजेचे असल्याचे मत लेखक युसूफ पठाण यांनी  युवकमित्र राज्यस्तरीय युवा संमेलनात व्यक्त केले.राजमाता आई जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त युवकमित्र परिवार, नंदूरबार या  चळवळीमार्फत पुणे शहरात 'राज्यस्तरीय युवा संमेलन' आयोजित करण्यात आले होते. यावेळी राज्यात युवा चळवळीत कार्य करणाऱ्या युवक  व युवतीचा यावेळी 'स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार'देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे पुणे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर हे होते तर उदघाटक म्हणून महाएनजिओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून विश्व जनकल्याण समितीच्या अध्यक्षा छायाताई भगत, ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण बागुल, सामाजिक कार्यकर्त्या उज्वला गायकवाड, राज्य युवा परिषदेचे समन्वयक प्रवीण प्रधान, युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, उदयकाळ फाऊंडेशनचे अध्यक्ष मयूर बागुल यांच्यासह राज्यातील युवक युवती उपस्थित होते. अमर हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रमोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्तिक चव्हाण, भीमा शिंदे यांनी परिश्रम घेतले.