रोजकुंड येथे मच्छरदाण्या वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST2021-08-20T04:34:44+5:302021-08-20T04:34:44+5:30
राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र मोरांबातर्फे रोजकुंड येथे जि.प. सदस्य प्रताप वसावे व वैद्यकीय अधिकारी ...

रोजकुंड येथे मच्छरदाण्या वाटप
राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र मोरांबातर्फे रोजकुंड येथे जि.प. सदस्य प्रताप वसावे व वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांच्या हस्ते गरजू लाभार्थ्यांना मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास जि.प.च्या माजी सदस्या जमनाबाई वसावे, सरपंच ईश्वर पाडवी, ग्रा.पं. सदस्य राजू वसावे, काथा वसावे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना कोरडा दिवस पाळणयाचे आवाहन करून डासांची उत्पत्ती कशी कमी करावी व मच्छरदाण्यांचा वापर करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रफुल्ल पठाडे व डॉ.योगेश्वर पाटील यांचे सहकार्य लाभले. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मोहिनी कुमावत, आरोग्य सेवक राजेंद्र अहिरे, आरोग्य सेविका डी.डी. पाडवी, वसावे, अजिनाथ साबळे, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.