दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 21:55 IST2020-07-14T21:55:39+5:302020-07-14T21:55:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. नंदुरबार तालुक्यात २०१९-२० ...

दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. नंदुरबार तालुक्यात २०१९-२० च्या यू-डायसनुसार व सर्वेक्षणानुसार ५६० दिव्यांग विद्यार्थी आहेत. यातील ३२ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले़
गटसाधन केंद्रात झालेल्या कार्यक्रमात पंचायत समिती उपसभापती लताबाई पटेल, गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी डी.जी. वसावे, सचिन गोसावी, एस.एन. पाटील, पालिकेचे प्रशासन अधिकारी आर.बी. पाटील, गटसाधन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते़ कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात हेमेश नरेश पाडवी (जिल्हा परिषद शाळा बद्रीझिरा), हितेश गरमल राठोड, पायल भगवान राजपूत (जिल्हा परिषद शाळा राकसवाडे), संकेत रवींद्र पाटील, निखील विजय सोनार (महात्मा फुले हायस्कूल, नंदुरबार), दुर्गा भगवान खडसे, अश्विनी सुरेश पवार (नगरपालिका शाळा क्रमांक एक) या दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध साहित्य वाटप करण्यात आले.
शिक्षण विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम अंतर्गत तपासणी करण्यात येते. यूडायस अंतर्गत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या आॅल्मीको मोजमाप शिबिर अंतर्गत तपासणी करुन त्यांना आवश्यक असलेले साहित्याचे मोजमाप घेण्यात आले होते.
प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालयाकडे प्राप्त साहित्य वाटप यादीनुसार तालुक्यातून बहुविकलांग, मतीमंद, कर्णदोष, सी.पी., अंध व अस्थिव्यंग असलेल्या ३२ दिव्यांग विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली़ विद्यार्थ्यांना सीपीचेअर, रोलेटर, व्हिलचेअर, एमआर कीट आदी गरजेच्या साधनांचे वाटप करण्यात आले़