खेडदिगर येथे लस घेणाऱ्यास ग्रामपंचायतमार्फत आंब्याचे रोप वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:26+5:302021-05-27T04:32:26+5:30

ग्रामीण भागात लसीकरण खूप कमी प्रमाणात होत आहे. मात्र आपल्याला कोरोनाला हरवायचे असेल तर लसीकरण हा महत्त्वाचा घटक आहे. ...

Distribution of mango saplings through Gram Panchayat to vaccinators at Kheddigar | खेडदिगर येथे लस घेणाऱ्यास ग्रामपंचायतमार्फत आंब्याचे रोप वाटप

खेडदिगर येथे लस घेणाऱ्यास ग्रामपंचायतमार्फत आंब्याचे रोप वाटप

ग्रामीण भागात लसीकरण खूप कमी प्रमाणात होत आहे. मात्र आपल्याला कोरोनाला हरवायचे असेल तर लसीकरण हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण ग्रामीण भागात झाले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने लसीकरण करणे आवश्यक आहे. लसीकरणासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून. मात्र ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरविण्यात आल्याने लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ग्रामीण भागात १०० टक्के लसीकरण व्हावे व आदिवासी नागरिकांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे. यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी विशेष उपक्रम राबविला आहे लसीकरण करून घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला दोन किलो तांदूळ, दोन किलो साखर स्वखर्चातून वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच खेडदिगर मंजुळाबाई मुसळदे, उपसरपंच गणेश बागुल, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण, गोविंद पटले, प्रवीण वळवी, भाजपा मोर्चा उपाध्यक्ष दंगल सोनवणे, प्रियांक पाटील, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष योगेश पाटील, बालू पाटील, रमाशंकर माळी, गुड्डू वळवी, दिलवर पवार, संतोष चित्ते, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पवार, गोपाळ गांगुर्डे, स्वीय सहायक हेमराज पवार, नवनाथ वाघ, गणेश पवार, दुर्गेश पाटील, सुकलाल रावताळे, ग्रामसेवक अरुण गवळे, जिल्हा परिषद मराठी शाळाचे मुख्याध्यपक महेंद्र निकुम, विकार अहमद शेख, तुकाराम धनगर, शकील पठाण, रेहमल पावरा उपस्थित होते.

आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकुमार सुरसे, औषध निर्माण अधिकारी राजेंद्र पाटील, आरोग्य सेवक प्रमोद सूर्यवंशी, सीमा पाठक रवींद्र पावरा, संगीता ठाकरे, आशा कार्यकर्ती पार्वती बागले, मनीषा चौधरी यांनी लसीकरण केले.

ग्रामपंचायतमार्फत आंब्याचे रोप वाटप

ऑक्सिजनचे महत्त्व समोर ठेवून जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण झाले पाहिजे. या अनुषंगाने खेड दिगर येथे झालेल्या कोविड लसीकरण शिबिरात उपस्थित लस घेणाऱ्यांना ग्रामपंचायतमार्फत आंब्याचे रोप वाटप करण्यात आले.

Web Title: Distribution of mango saplings through Gram Panchayat to vaccinators at Kheddigar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.