शहादा तालुक्यात ४०० दिव्यांग, ज्येष्ठांना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST2021-06-25T04:22:20+5:302021-06-25T04:22:20+5:30

यावेळी आमदार डाॅ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, सुप्रिया गावित, डाॅ. ...

Distribution of literature to 400 disabled and senior citizens in Shahada taluka | शहादा तालुक्यात ४०० दिव्यांग, ज्येष्ठांना साहित्य वाटप

शहादा तालुक्यात ४०० दिव्यांग, ज्येष्ठांना साहित्य वाटप

यावेळी आमदार डाॅ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतन पाडवी, पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल, सुप्रिया गावित, डाॅ. कांतीलाल टाटिया, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सीमा सोनगिरे, पंचायत समितीच्या सदस्य गणेश पाटील, नगरसेवक संदीप शंकर पाटील, संजय साठे, संतोष वाल्हे, किरण पावरा, आदी उपस्थित होते

कार्यक्रमात दिव्यांगांना कृत्रिम अंग तसेच ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले. यात व्हीलचेअर, कुबड्या, चष्मे, श्रवणयंत्र, स्मार्टफोन, वाॅकरसह अन्य साहित्याचा समावेश होता. शहादा तालुक्यातील एकूण ४०० जणांना साहित्य वाटप करण्यात आले. जिल्ह्यात एक हजार लाभार्थ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून, येत्या काळात त्यांना हे साहित्य दिले जाणार आहे.

यावेळी बोलताना खासदार डाॅ. हीना गावित यांनी दिव्यांग व्यक्तींचा जिल्हाभरात पारदर्शक पद्धतीने सर्व्हे करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींना काय लागेल याची माहिती भरून घेण्यात आली आहे. येत्या आठवड्यात जिल्ह्यात साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. विष्णू जोंधळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Web Title: Distribution of literature to 400 disabled and senior citizens in Shahada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.