बोरद येथे ५५३ लाभार्थींना खावटी किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST2021-08-14T04:36:01+5:302021-08-14T04:36:01+5:30
या वेळी जि.प. अध्यक्षा ॲड.सीमा वळवी म्हणाल्या की, आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांच्या प्रयत्नांनी खावटी योजना मंजूर झाली असून ...

बोरद येथे ५५३ लाभार्थींना खावटी किटचे वाटप
या वेळी जि.प. अध्यक्षा ॲड.सीमा वळवी म्हणाल्या की, आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांच्या प्रयत्नांनी खावटी योजना मंजूर झाली असून त्या योजनेचा लाभ लाभार्थींना दिला जात आहे. दोन हजार रुपये रोख व दोन हजार रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे किट लाभार्थींना वाटप करण्यात येत आहे. जे लाभार्थी राहिले असतील त्यांचाही संबंधित अधिकाऱ्यांमार्फत सर्वे होऊन त्यांना लाभ देण्यात येईल, असे सांगितले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी यांनी प्रास्ताविकातून खावटी योजनेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमास संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्या निशा वळवी, बोरदच्या सरपंच वासंतीबाई ठाकरे, जि.प.चे माजी सभापती नरहर ठाकरे, पं.स.चे माजी उपसभापती नंदूगीर गोसावी, सीताराम राहासे, दयानंद चव्हाण, इंदिराबाई चव्हाण, रवींद्र वरसावे, आदिवासी सहकारी संस्थेचे चेअरमन सुकलाल ठाकरे, विक्रम डुमकूळ, तुळशीराम पाटील, केंद्रप्रमुख प्रवीण पाटील, मुख्याध्यापक रऊफ शाह, पं.स. सदस्य चंदनकुमार पवार आदी उपस्थित होते.