भरडू येथे २४१ लाभार्थींना खावटी किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:31 IST2021-08-15T04:31:22+5:302021-08-15T04:31:22+5:30
कार्यक्रमास जि.प. सदस्य दीपक नाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पं.स. सभापती रतिलाल कोकणी यांनी पंचायत समितीच्या योजना व ...

भरडू येथे २४१ लाभार्थींना खावटी किटचे वाटप
कार्यक्रमास जि.प. सदस्य दीपक नाईक यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पं.स. सभापती रतिलाल कोकणी यांनी पंचायत समितीच्या योजना व खावटी अनुदान वाटपाविषयी माहिती दिली. आदिवासी सेवा सहायक व शिक्षण प्रसारक संस्थेतेचे मानद सचिव तानाजीराव वळवी यांनी लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण व खावटी अनुदान बँक खात्यातील रकमेविषयी जागृती केली. आमदार शिरीष नाईक म्हणाले की, शासनाच्या विविध योजना व त्यासाठी वेळोवेळी मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्याकडे होत असलेला पाठपुरावा, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असलेल्या योजनांविषयी माहिती दिली. प्रकल्प अधिकारी मिनल करनवाल यांनी खावटी अनुदान लाभार्थींना किटसोबतच लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य पथकासह लस उपलब्ध करून दिली.
यावेळी नवापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जालमसिंग गावीत, भरडूचे सरपंच बाबू गावीत, उपसरपंच दासू गावीत, पोलीस पाटील महेश वळवी, माजी सरपंच विपीन गावीत, भांगरपाडाचे सरपंच जयंत पाडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतलकुमार पाडवी, डॉ. संगीता जाधव, नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी डी.जी. बागूल, डी.एच. माळी, पी.एम. वसावे व प्राथमिक मुख्याध्यापक नरेश मोरे, माध्यमिक मुख्याध्यापक महेंद्र वळवी, अधीक्षक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जितेंद्र कुवर यांनी केले, तर आभार कनकसिंग सिसोदे यांनी मानले.