उमराण व भरडू गटात खावटी अनुदान किट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST2021-08-22T04:33:33+5:302021-08-22T04:33:33+5:30
कार्यक्रमाला बिलबारा सरपंच सुदाम वळवी, कोकणीपाडा सरपंच दुर्जन कोकणी, सोनारे सरपंच प्रभावती राजेश पाडवी, वासदा सरपंच सुनील वसावे, बिलदा ...

उमराण व भरडू गटात खावटी अनुदान किट वाटप
कार्यक्रमाला बिलबारा सरपंच सुदाम वळवी, कोकणीपाडा सरपंच दुर्जन कोकणी, सोनारे सरपंच प्रभावती राजेश पाडवी, वासदा सरपंच सुनील वसावे, बिलदा सरपंच नरेंद्र गावीत, भांगरपाडा सरपंच जयवंत पाडवी, अनिल वसावे, तारपाडा येथील राजेंद्र गावीत, माजी सरपंच प्रदीप वळवी, सुभाष कोकणी, लालसिंग वसावे, धेड्या वळवी आदी उपस्थित होते.
बिलबारा येथे १००, कोकणीपाडा ३३, भांगरपाडा ७३, सोनारे १७६, वासदे ७६, चिखली येथे ९० किट वाटप करण्यात आले. अंजने येथील ११२ लाभार्थ्यांना लवकरच किट वाटप करण्यात येणार आहे.
खावटी अनुदान योजनेंतर्गत दोन हजार किंमतीच्या किटमध्ये मटकी, चवळी, हरभरा, पांढरा वटाणा, तूरदाळ, उडीद डाळ, मीठ, गरम मसाला, शेंगदाणा, तेल, मिरची पावडर, चहा पावडर, साखर आदी वस्तू देण्यात आले. अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेतील मुख्याध्यापक महेंद्र वळवी, किसन गोडसे यांच्या नियोजनानुसार सर्व लाभार्थ्यांना शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून खावटी अनुदान मिळाले.