Distribution of essential items including food for martyrdom | शहाद्यात जेवणासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

शहाद्यात जेवणासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाच्या आपत्तीची जाणीव लक्षात घेता हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांना सिनी टाटा ट्रस्टच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे १७०० पॉकटेचे वाटप प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांना टाटा ट्रस्टच्या वतीने कुटुंबाला आवश्यक असलेले गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, साखर, मिठ आदी वस्तूंचे पॉकेट वाटप करण्यात आले. प्रकाशा रस्त्यावरील वीज कंपनीच्या उपकेंद्रालगत राहणाºया मजुरांना या वस्तूंचे वाटप प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, जि.प.चे बांधकाम सभापती अभिजित पाटील, टाटा ट्रस्टच्या डॉ.श्रद्धा निकनवडे, डॉ.सुमित देवरे, राजदत्त कोसंबी, अमर माळी, पालिकेचे बांधकाम अभियंता टेंभेकर, महसूल, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. प्रांताधिकारी डॉ.गिरासे म्हणाले की, देशभरात आलेल्या कोरोना आपत्तीवर मात करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे. प्रशासन हातावर पोट भरणाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंना तुटवडा पडू देणार नसल्याचे सांगून सिनी टाटा संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. शहर व परिसरातील सामाजिक संस्थ, नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू गरीबांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाल्याने दलित-श्रामिकांपुढे प्रश्न उभा राहिला आहे. शहरातील गोरगरिबांच्या वस्तीत जाऊन शहरातील स्वयंसेवी समाजसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह दानशूरांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. गहू, पीठ, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मीठ, मिरची आदींचे किट बनवून ते श्रमिक वसाहतीत संचारबंदी शिथील काळात घरपोच केले जात आहे. शहरातील नवीन पोलीस स्टेशन शेजारच्या भेंडवा नाला वस्ती, श्रमिक कॉलनी, सालदार नगर, गरीब नवाज कॉलनी भागात मदतीचे वाटप करण्यात आले.
भेंडवा नाला परिसर
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन झाल्याने शहादा येथे गरजू कुटुंबांना आमदार राजेश पाडवी यांनी जीवनावश्यक वस्तूंचे पॉकेट वाटप केले. शहादा शहरात अनेक गोरगरीब कुटुंब मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र देशात लॉकडाऊनमुळे मजुरांना रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शहादा येथील भेंडवा नाला परिसरातील गरजू कुटुंबांना आमदार राजेश पाडवी यांनी जीवनावश्यक वस्तूंचे पॉकेट वाटप केले. या वेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, विरसिंग पाडवी, भाजपाचे शहराध्यक्ष अतुल जयस्वाल, भुºया पवार, दिनेश खंडेलवाल, हेमराज पवार, मयूर बाविस्कर, विक्की ठाकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of essential items including food for martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.